सध्या अमेरिकेत यूएस मास्टर्स टी10 लीग ही स्पर्धा खेळली जात आहे. शनिवारी (19 ऑगस्ट) या स्पर्धेत कॅलिफोर्निया नाईट्स अनिरुद्ध टेक्सास चार्जर्स असा सामना खेळला गेला. यामध्ये कॅलिफोर्निया संघाने 48 धावांनी मोठा विजय साजरा केला. संघाच्या या विजयात सर्वात वयस्कर खेळाडू असलेला दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिस हा चमकला. त्याने तुफानी फलंदाजी करत सर्वांची मने जिंकली.
अमेरिकेत प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेत अनेक सक्रिय तसेच निवृत्त झालेले क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. यामध्ये क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन महान अष्टपैलू जॅक कॅलीस हा कॅलिफोर्निया नाईट्स संघाचा भाग आहे. टेक्सास संघाविरुद्धच्या सामन्यात तो ऍरॉन फिंचसह सलामीला फलंदाजीला उतरला. फिंच दुसऱ्याच चेंडूवर बाद झाल्याने संघाची सुरुवात खराब झालेली.
अशावेळी केलीस याने मिलिंद कुमार याला साथीला घेत विरोधी संघाच्या गोलंदाजांवर तुफान आक्रमण केले. दोघांनी पूर्ण दहा षटके फलंदाजी करताना तब्बल 158 धावांचा डोंगर उभा केला. मिलिंद याने 28 चेंडूंमध्ये नाबाद 76 धावा केल्या. यामध्ये सात चौकार व सहा षटकारांचा समावेश होता.
The Jacques Kallis show…!!
An extraordinary knock of 64* in just 31 balls by the 48 year old Kallis in the US Masters T10 League. pic.twitter.com/qgAhU8ZRH6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 20, 2023
दुसऱ्या बाजूने कॅलिस याने देखील तसेच आक्रमक रूप दाखवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन 9 वर्ष झाले असले तरी कॅलिस याने आपल्या फलंदाजीतील मनमोहक रूप दाखवले. कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, पूल आणि हूकचे पारंपारिक फटके मारण्यासोबतच त्याने स्कूपचे फटके देखील मारले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहताना 31 चेंडूवर 8 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या.
या धावांचा बचाव करताना ऍश्ले नर्स याने तीन बळी घेत कॅलिफोर्निया संघासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. टेक्सास संघाचा डाव केवळ 110 धावांवर गुंडाळत त्यांनी मोठा विजय संपादन केला.
(Jaques Kallis Hits Batting Masterclass In US Masters T10 League)
महत्वाच्या बातम्या-
‘जय शाहला पाहून कोण टाळ्या वाजवेल?’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूने साधला पीसीबीवर निशाणा
रॉयल लंडन कपमधून बाहेर पडल्यानंतर पृथ्वी शॉने दिला इतरांना दोष! इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत