लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून (२ सप्टेंबर) चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरु झाला आहे. पण, या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (३ सप्टेंबर) ‘जार्वो’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो सामना सुरु असताना थेट मैदानात घुसला आणि त्याने बेअरस्टोला धक्का दिला होता. यानंतर आता त्याला अटक करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे.
सलग तिसऱ्यांदा जर्वोची मैदानात घुसखोरी
ओव्हल कसोटीदरम्यान इंग्लंडच्या पहिल्या डावात ऑली पोप आणि जॉनी बेअरस्टो फलंदाजी करत असताना ३४ व्या षटकावेळी जार्वो अचानक मैदानात आला होता. या षटकातील तिसरा चेंडू टाकण्याच्या तयारीत उमेश यादव होता, त्याचवेळी त्याला मागून ६९ क्रमांकाची भारताची जर्सी घातलेला जार्वो येताना दिसला.
जार्वो यावेळी जोरात धावत आला आणि गोलंदाजी करण्याची कृती करु लागला. त्यावेळी तो नॉन-स्ट्रायकरवर असलेल्या बेअरस्टोला देखील जोरात जाऊन धडकला. बेअरस्टोला याबाबत कसलीच कल्पना नसल्याने तो या धक्क्याने चकीत झाला. या घटनेमुळे काहीवेळ सामना थांबला होता.
माध्यमांतील वृत्तांनुसार या घटनेनंतर आता जार्वोला लंडन पोलिसांनी मारहाणीच्या संशयावरुन अटक केली आहे. सध्या तो दक्षिण लंडन पोलिसांच्या ताब्यात आहे.
जार्वो हा यापूर्वी लॉर्ड्स, तसेच हेडिंग्ले कसोटीतही मैदानात घुसला होता. लॉर्ड्स कसोटी दरम्यान तो क्षेत्ररक्षण करण्याच्या हेतूने, तर हेडिंग्ले कसोटी दरम्यान बॅट घेऊन मैदानात उतरला होता.
Jarvo again!!! Wants to bowl this time 😂😂#jarvo69 #jarvo #ENGvIND #IndvsEng pic.twitter.com/wXcc5hOG9f
— raghav (@raghav_padia) September 3, 2021
JARVO 69, multitalented player for India:
2nd Test – comes to field
3rd Test – comes to bat
4th Test – comes to bowl#jarvo69 #IndvsEng pic.twitter.com/kwCHegNssh— sohom (@AwaaraHoon) September 3, 2021
सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
जार्वोच्या या कृतीमुळे इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण सलग तिसऱ्यांदा इंग्लंड विरुद्ध भारत कसोटीदरम्यान ही घटना घडली आहे. त्यामुळे अनेकांनी इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणेवर टीका केली आहे. एखादा प्रेक्षक एकदा-दोनदा नव्हे, तर सातत्याने मैदानात घुसघोरी कसा करु शकतो, असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे. तसेच त्याच्यावर कारवाईसाठी इतका उशीर का लावला जात आहे, असेही प्रश्न उपस्थित झाले.
इतकेच नाही, तर या घटनेमुळे खेळाडूंच्या सुरक्षेबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहे. खेळाडू आधीच बायोबबल सारख्या गोष्टींचा सामना करत असतानाच जार्वोसारख्या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
त्याचबरोबर असाही मुद्दा उपस्थित होत आहे की अशीच घटना भारतात किंवा भारतीय उपखंडात घटली असती, तर त्याबद्दल इंग्लिश माध्यमांनी सुरक्षा यंत्रणेवर जोरदार टीका केली असती. मात्र, इंग्लंडमध्ये ही घटना घडत असल्याने केवळ त्यावर मीम्स बनवल्या जात आहेत. तसेच या घटनेकडे केवळ एक मनोरंजन म्हणून पाहिले जात आहे.
I think a few people need to be sacked at grounds in England. This is a very serious security lapse and it just continues. Not even a prank anymore. #Jarvo #Idiot.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) September 3, 2021
Security guards at English grounds: #Jarvo #EngvInd pic.twitter.com/0TE4S4vmS5
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) September 3, 2021
Wonder whether #Jarvo running on to every ground is some PR/marketing gimmick?
— Cricketwallah (@cricketwallah) September 3, 2021
Don't tell me the whole #Jarvo saga is a broadcaster/home board PR stunt! It's stupid either way. 0/100 either to the stunt or the security. #EngvInd
— Ajith Ramamurthy (@Ajith_tweets) September 3, 2021
#jarvo strikes again. Not sure how Englishmen will react if it were to happen on their tour to India. Though the guy is funny harmless and hopefully covid free, this doesn't sound good for security on ground. #IndvsEng pic.twitter.com/p8BuTY7SBp
— நல்ல படி வாழ சொல்லி மண்ணை கொடுத்தானே பூர்வகுடி (@koel_tweets) September 3, 2021
If it were any other country, especially a sub-continent nation, think about the outrage that would have followed. #PitchInvader #ENGvsIND
— Talib Kara (@Talibkara) September 3, 2021
If this happened thrice in India during covid, English media and ex-cricketers would have asked for Ganguly's head. https://t.co/33a2cp6PHX
— Manya (@CSKian716) September 3, 2021
This not funny anymore😡#Jarvo entering the cricket field and reaching the main wicket should be taken as a serious offence now. pic.twitter.com/Ji7U2uDLc1
— Sunandan Lele (@sunandanlele) September 3, 2021
यॉर्कशायर क्रिकेटने केली होती कारवाई
हेडिंग्ले मैदान हे यॉर्कशायर काउंटी संघाचे घरचे मैदान आहे. तिसरा सामना संपल्यानंतर यॉर्कशायर क्रिकेटने मैदानात घुसलेल्या जार्वोवर कारवाई केल्याचे सांगितले होते. त्यांनी जार्वो याला आर्थिक दंड तसेच आयुष्यभर या मैदानावर न येण्याची कारवाई केली. सुरक्षा नियमांचा भंग केल्यामुळे ही कारवाई केल्याचे यॉर्कशायर क्रिकेटकडून सांगितले गेले होते.
पण, असे असतानाही जार्वो ओव्हल कसोटीदरम्यान पुन्हा मैदानात घुसला. त्यामुळे अखेर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जार्वो आला अन् थेट पळत जाऊन बेअरस्टोला धडकला, भारताचा ब्रिटिश चाहता तिसऱ्यांदा घुसला मैदानात
मैदानात घुसखोरी केलेल्या भारतीय चाहत्यावर केली गेली ‘कडक कारवाई’
वारंवार मैदानात घुसणाऱ्या ‘त्या’ चाहत्यावर भडकला अश्विन, म्हणाला…