अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी ट्वेंटी सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय बाद झाला तेव्हा चिडून मैदानाबाहेर पडताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉस बटलर सलामीला फलंदाजीसाठी आले. यावेळी बटरल पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र, त्यानंतर रॉय चांगल्या लयीत फलंदाजी करत होता. यावेळी तो अर्धशतक करेल असे वाटत होते.
मात्र, असे असतानाच वॉशिंग्टन सुंदरने जेसन रॉयला ४६ धावांवर माघारी धाडले. भुवनेश्वर कुमारने त्याचा उत्कृष्ट झेल टिपला. त्यानंतर बाद होऊन मैदानाबाहेर जात असताना रॉयने संतप्त होऊन आपले ग्लव्हज आणि हेल्मेट फेकले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच अनेक क्रिकेट चाहते या घटनेवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. तसेच ‘ही तुमची खिलाडूवृत्ती आहे का?’ असा प्रश्न एका चाहत्याने सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.
https://twitter.com/tridibr100/status/1371108259524800516
One run short from his fifty two nights ago & 4 runs short from his fist tonight😮 JASON ROY!!!#indvsengt20 pic.twitter.com/TLOJaYMC2m
— Shafi Shehzad (@ShafiUOfficial) March 14, 2021
Bhuvi takes stunner to get Jason roy out 🔥🔥#INDvEND #BHUVNESHWARKUMAR #Bhuvi #Jasonroy pic.twitter.com/NRLc4YmI8V
— Being Sarcastic (@boysnationin) March 14, 2021
इंग्लंड संघाने केल्या १६४ धावा
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. भुवनेश्वर कुमारने जोस बटलरला (०) धावांवर माघारी धाडले. त्यांनतर जेसन रॉय(४६),डेव्हिड मलान (२४),जॉनी बेअरस्टो (२०),मॉर्गन ( २८) ,बेन स्टोक्स ( २४) तर सॅम करनने नाबाद (६) धावा केल्या. त्यामुळे २० षटकाअखेर इंग्लंड संघाने ६ बाद १६४ धावा केल्या होत्या.
भारतीय संघाकडून गोलंदाजी करतांना वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी १ गडी बाद करण्यात यश आले.
७ गडी राखून भारतीय संघाने मिळवला विजय
भारताकडून १६५ धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीला उतरलेल्या केएल राहुलला चांगली सुरुवात करून देण्यात अपयश आले. तो ६ चेंडू खेळत शुन्य धावा करत माघारी परतला. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या ईशान किशनने कर्णधार विराट कोहलीसह मिळून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. तसेच ९४ धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला.
किशनने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकवत ५६ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतने आक्रमक २६ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७३ आणि श्रेयस अय्यरने नाबाद ८ धावा करत भारताला हा सामना ७ विकेट्सने जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
क्या बात अफगानिस्तान! क्रिकेटच्या इतिहासात केवळ ऑस्ट्रेलियालाच जमलेल्या त्या विक्रमाची केली बरोबरी
अर्धशतक करण्याआधी ‘या’ घटनेमुळे विराट कोहली झाला ट्रोल, पाहा व्हिडिओ
Video : धोनीने रोहित शर्माला म्हटले ‘लोभी’, पाहा काय आहे नक्की प्रकरण