जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध नॉटिंघम कसोटीच्या पहिल्या डावात 28 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि एक खणखणीत षटकार ठोकला. नेहमी आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या बुमराहची फलंदाजी पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खूप खूश झाला आहे. त्याने ट्विट करत त्याची पाठ थोपटली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात 95 धावांची आघाडी घेतली आहे. ज्यामध्ये केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने मोठे योगदान दिले. राहुलने 84 धावांची खेळी खेळली आणि जडेजानेही 56 धावांची शानदार खेळी करत त्यास मोलाची साथ दिली. शिवाय तळाच्या फलंदाजांनीही केलेल्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाला मोठी आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
There were critics questioning your performance a month ago.
You started & ended our bowling performance with Bumrah specials 🧡
Your batting today will just brighten up our weekend, for sure …
That 6️⃣ will remain in our ❤ forever, @Jaspritbumrah93 🔥pic.twitter.com/szXv849EVk
— North Stand Gang – Wankhede (@NorthStandGang) August 6, 2021
विशेषत: जसप्रीत बुमराह, तो दहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आणि त्याने 34 चेंडूत 28 धावा केल्या. बुमराहने आपल्या खेळीदरम्यान सॅम करनच्या षटकात 3 चौकार आणि एक शानदार षटकार ठोकला. सचिन तेंडुलकर देखील बुमराहच्या या षटकाराचा चाहता झाला आहे. बुमराहच्या फलंदाजीने सचिनला इतके प्रभावित केले की, त्याने त्यासाठी खास ट्विटही केले आहे.
सचिन तेंडुलकरने ट्विट करून लिहिले की, “तळाच्या फलंदाजांनी केलेल्या महत्त्वपूर्ण धावांमुळे भारतीय संघाला मोठी आघाडी मिळाली आहे. इंग्लंड संघाची दुसऱ्या डावाची खेळी पाहणे औत्सुक्याचे असेल. आणि जसप्रीत बुमराहने आज त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम शॉट खेळला आहे.”
Formidable lead for #TeamIndia after some important runs added by the tail.
It’ll be interesting to see how England respond after being behind.
By the way, @Jaspritbumrah93 just played the shot of his life today. 😀#ENGvIND
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 6, 2021
सचिन तेंडुलकर जसप्रीत बुमराहच्या ज्या षटकाराबद्दल बोलत आहे, तो षटकार त्याने वेगवान गोलंदाज सॅम करेनच्या चेंडूवर खेचला होता. सॅम करेनने जसप्रीत बुमराहला शॉर्ट बॉल टाकला, ज्यावर बुमराहने पुल शॉट खेळत चेंडू स्क्वेअर लेगच्या सीमारेषेवर टोलावला होता. बुमराहचा हा षटकार सुमारे 80 मीटरचा होता. बुमराहचा हा षटकार पाहून सगळेच आवाक् झाले आहेत. खरं तर बुमराह त्याच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो पण ज्याप्रकारे त्याने फलंदाजी केली ती भारतीय संघासाठी खूप महत्वाची ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सॅम करनच्या षटकात बुमराहने केला चौकार-षटकारांचा वर्षाव, गोलंदाजाच्या चेहऱ्याचा उडाला रंग
मोक्याच्या क्षणी जिम्मीने टाकला असा काही चेंडू की, राहुलने दिली स्वत:ची विकेट; बघा व्हिडिओ
नॉटिंघम स्टेडियममध्ये दिसला अगदी रिषभसारखा व्यक्ती; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘हा तर पंतचा जुळा भाऊ’