---Advertisement---

जसप्रीत बुमराह असा मोठा पराक्रम करणारा दुसराच भारतीय गोलंदाज…

On: रविवार, फेब्रुवारी 24, 2019 10:30 PM
---Advertisement---

आज (24 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर 3 विकेट्सने विजय मिळवला. भारतीय संघाला या सामन्यात पराभव स्विकारावा लागला असला तरी हा सामना भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी खास ठरला आहे.

या सामन्यात भारताकडून बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. याबरोबरच बुमराहने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 50 विकेट्स घेण्याचा टप्पा पार करण्याचा पराक्रम केला आहे.

हा टप्पा पार करणारा तो दुसराच भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने हा टप्पा गाठला आहे. अश्विनने टी20 मध्ये 46 सामन्यात 52 विकेट्स घेतल्या आहेत.

याबरोबरच बुमराह टी20 मध्ये भारताकडून सर्वात जलद 50 विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरला. अश्विनने 42 सामन्यात 50 विकेट्सचा टप्पा गाठला होता. तर बुमराहने 41 व्या सामन्यात हा कारनामा केला आहे.  बुमराहने आत्तापर्यंत 41 सामन्यात 51 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच युजवेंद्र चहललाही हा पराक्रम करण्याची संधी आहे. पण त्यासाठी त्याला अजून 4 विकेट्सची गरज आहे. चहलने 30 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 46 विकेट्स घेतल्या आहेत.

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-

52 – आर अश्विन (46 सामने)

51 – जसप्रीत बुमराह (41 सामने)

46 – युजवेंद्र चहल (30 सामने)

36 – भुवनेश्वर कुमार (37 सामने)

36 – हार्दिक पंड्या (38 सामने)

35 – कुलदीप यादव(18 सामने)

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अशी वाहिली श्रद्धांजली

धावा केल्या २४ तरी किंग कोहलीच्या नावावर झाला हा विश्वविक्रम…

भारताकडून आज पदार्पण करणारा कोण आहे मयंक मार्कंडे…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment