भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ओली पोप मोठी खेळी करू शकला नाही. पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात त्याने भारतीय गोलंदाजांचा घाम काढला होता. विशाखापट्टणममध्ये उभय संघांतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. शनिवारी (3 जानेवारी) म्हणजेच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघाचा पहिला डाव सुरू झाला. ओली पोप याच्या रुपात इंग्लंडने आपली चौथी विकेट गमावली. ही विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराह याची सर्वत्र चर्चा होत आहे.
विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंड संघ सध्या अडचणीत दिसत आहे. 159 धावांवर इंग्लंडने आपली पाचवी विकेट गमावली. तत्पूर्वी ओली पोप याच्या रुपात इंग्लंडला चौथा झटका बसला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला ओली पोप (Oli Pope) 55 चेंडूत 23 धावांचे योगदान देऊ शकला. पहिल्या डावातील 28व्या षटकात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने पोपोचा त्रिफला उडवला. त्याने टाकलेला यॉर्कर चेंडूक इतका घात होता की, फलंदाजाची बॅट आणि जमिनीला टेकण्याआधी चेंडू स्टंप्समध्ये घुसला. वेगवान यॉर्करने ऑन स्ट्राईकवरील दोन स्टंप्स हवेत अडताना दिसले. ओली पोप आपली विकेट गमावल्यानंत चांगलाच संतापला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुपान व्हायरल होत आहे.
BUMRAH IN GOD MODE 👑🔥pic.twitter.com/3SKlToQ7cJ
— Johns. (@CricCrazyJohns) February 3, 2024
BUMRAH DESERVES A SEPRATE AWARD FOR THIS MENTAL YORKER…!!! 🤯🔥pic.twitter.com/mtkf3D5E6s
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 3, 2024
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 112 षटकांमध्ये 396 धावा केल्या. यामध्ये एकट्या यशस्वी जयस्वालच्या 209 धावा होत्या. इंग्लंडसाठी पहिल्या डावात जेम्स अँडरसन, रेहान अहमद आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. (Jasprit Bumrah bowled a powerful yorger to dismiss Oli Pope)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव
इंग्लंड – झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –
यशस्वी जयस्वाल सोडता भारताचे सर्व फलंदाज फ्लॉप, अँडरसन पुन्हा फॉर्मात, शनिवारी पहिल्या सत्रात भारत सर्वबाद
U19 World Cup 2023 । अजिंक्य राहत भारताची उपांत्य सामन्यात धडक, इतर दोन संघांनीगी गाठली पुढची फेरी