---Advertisement---

हार्दिकचा ‘भाई’ लूक बघून बुमराह झाला रिऍक्ट; म्हणाला, ‘हा ईगल गँगचा मेंबर’

---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. तसेच हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यावर हार्दिक पंड्याला स्थान देण्यात आले नाहीये. त्यामुळे तो घरीच मिळालेल्या रिकाम्या वेळेचा आनंद घेताना दिसून येत आहे. आपल्या हटके स्टाइल आणि हँडसम लूक्समुळे प्रसिद्ध असलेल्या हार्दिकने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनून आहे.

हार्दिक पंड्या हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमीच काही-ना-काही पोस्ट करत आपल्या चाहत्यांसोबत जोडलेला असतो. नुकताच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो ‘भाई’ स्टाइलमध्ये दिसून येत आहे. या फोटोवर पत्नी नताशासह वहिनी पंखुरी शर्मा, मोहसीन खान, सिद्धेश लाड आणि अनेक चाहत्यांनी देखील आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CPu1_eglODy/?utm_medium=copy_link

परंतु भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या यॉर्करने हार्दिक पंड्याला क्लीन बोल्ड केले आहे. बुमराहने या फोटोवर प्रतिक्रीया देत हार्दिकला “ईगल गँगच्या मेंबर” असे म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा २००० मध्ये एका चित्रपट आला होता, ज्यामध्ये त्याच्या गँगचे नाव ईगल गँग असे होते. या चित्रपटात ईगल गँगसह बिच्‍छू गँगदेखील होती. त्या दोघांमध्ये नेहमी भांडण होत असायचे. बुमराहने हार्दिकच्या ‘भाई’ लूकमुळे ही प्रतिक्रीया दिली आहे.

हार्दिक पंड्याला गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघात स्थान दिले जात नाहीये. यागमाचे कारण असे की, जेव्हापासून तो दुखापतीतून बाहेर आला आहे. तेव्हापासून तो गोलंदाजी करू शकत नाहीये. हेच मुख्य कारण आहे की, त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला टी-२० आणि वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी हार्दिकला संघात स्थान दिले जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

मन जिंकलंस लेका! अवघ्या ९ वर्षीय मुलाची प्रतिभा पाहून दिग्गज स्टीव्ह वॉ देखील दंग; मानले आभार

दुर्दैवच अजून काय! पदार्पणात द्विशतक ठोकणारा ‘हा’ किवी फलंदाज जगतोय हलाखीचे आयुष्य

प्रवीण कुमारने शेअर केला सहकाऱ्यांसोबतचा जुना फोटो; चाहते म्हणाले, ‘वो दिन भी क्या दिन थे’!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---