भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेणाऱ्या वसीम जाफरने (Wasim Jaffer) त्याच्या ११ जणांच्या सर्वोत्तम टी२० संघाची निवड केली आहे. यामध्ये विशेष म्हणजे जाफरने प्रत्येक देशाच्या एका खेळाडूला स्थान दिले आहे.
जाफरच्या या टी२० संघात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला स्थान दिलेले नाही. इतकेच नव्हे तर या संघात भारतीय संघातून एमएस धोनी, रोहित शर्मा यांच्याऐवजी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची निवड करण्यात आली आहे. या संघात बुमराहला ११ व्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले आहे.
त्याचबरोबर जाफरने या टी२० संघाचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे (David Warner) सोपविले आहे. या टी२० संघात सलामीवीर फलंदाज म्हणून वॉर्नर आणि पाकिस्तान संघाचा फलंदाज बाबर आझमला (Babar Azam) निवडले आहे. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनची (Kane Williamson) निवड करण्यात आली आहे.
या संघात चौथ्या क्रमांकासाठी जाफरने दक्षिण आफ्रिका संघाचा फलंदाज एबी डिविलियर्सची (AB De Villiers) निवड केली आहे. तर इंग्लंडचा फलंदाज जॉस बटलरला (Joss Buttler) यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पाचव्या क्रमांकावरील स्थान दिले आहे.
जाफरने या टी२० संघात अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून वेस्ट इंडीजच्या आंद्रे रसेलची (Andre Russell) निवड केली आहे. याव्यतिरिक्त ५ गोलंदाजांचाही समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये बांगलादेशचा फिरकीपटू गोलंदाज शाकिब अल हसन (Shakib Al Hasan), अफगाणिस्तानचा फिरकीपटू गोलंदाज राशिद खान (Rashid Khan), नेपाळचा गोलंदाज संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane), श्रीलंका संघाचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आणि भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या गोलंदाजांचा समावेश आहे.
जाफरने आपल्या वयाच्या ४२ व्या वयापर्यंत देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. त्याचबरोबर त्याने भारतीय संघाकडून २००० ते २००८ दरम्यान एकूण ३१ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३४.१० च्या सरासरीने एकूण १९४४ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने भारतासाठी एकूण २ वनडे सामनेही खेळले आहेत.
याव्यतिरिक्त प्रथम श्रेणी क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २६० सामन्यांमध्ये ५०.६७ च्या सरासरीने एकूण १९४१० धावा केल्या आहेत. यामध्ये ५७ शतके आणि ९१ अर्धशतकांचा समावेश आहे.
This is my 'Best T20I XI' by picking
ONLY ONE player from a country:
1 @davidwarner31 (c) ????????
2 @babarazam258 ????????
3 Kane ????????
4 @ABdeVilliers17 ????????
5 @josbuttler (wk) ????????
6 @Russell12A ????????
7 @Sah75official ????????
8 @rashidkhan_19 ????????
9 @IamSandeep25 ????????
10 Malinga????????
11 @Jaspritbumrah93 ????????— Wasim Jaffer (@WasimJaffer14) April 20, 2020
असा आहे वसीम जाफरचा ११ जणांचा सर्वोत्तम टी२० संघ-
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), बाबर आझम, केन विलियम्सन, एबी डिविलियर्स, जॉस बटलर (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, राशिद खान, संदीप लामिछाने, लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह.
ट्रेंडिंग घडामोडी-
-या भारतीय खेळाडूने टेरेसवरच बनवली पीच, गॅस सिलेंडरच्या मदतीने करतेय वजनाचे व्यायाम
-लाॅकडाऊनमध्ये झिवाला घेऊन धोनीची बाईक राईड, व्हिडीओ होतोय व्हायरल
-कपिल देवचा नवीन लूक आला समोर; कोण म्हणतयं ‘कटप्पा’ तर कोणी म्हणाले ‘थानोस’






