---Advertisement---

बुमराहने पुन्हा तेच केलं तर मग मात्र टीम इंडियाचं….

On: गुरूवार, फेब्रुवारी 27, 2020 6:04 AM
---Advertisement---

24 फेब्रुवारीला वेलिंग्टन (Wellington) येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (1st Test Match) पार पडला. हा सामना न्यूझीलंडने 10 विकेट्सने जिंकला. तसेच मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर भारताचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्याचबरोबर भारतीय गोलंदाजीही निराशादायी ठरली. विशेषत: अशा परिस्थितीत भारतीय संघाला पराभवाच्या दरीतून वर काढत विजय मिळवून देणाऱ्या बुमराहलाही चांगली कामगिरी करता आली नाही. या सामन्यात त्याला एकाच विकेटवर समाधान मानावे लागले. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

या सामन्यात बुमराहला योग्य लेंथचा वापर करता आला नाही. तो कधी फुल तर कधी शॉर्ट असा चेंडू टाकत राहिला. बुमराहच्या खराब गोलंदाजीचा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी फायदा उचलला आणि भरपूर धावा केल्या.

आता 29 फेब्रुवारीपासून न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. जर या सामन्यातही बुमराहला चांगली कामगिरी करता आली नाही, तर भारताला न्यूझीलंडविरुद्ध 2-0ने मालिका गमवावी लागू शकते.

जानेवारी 2020मध्ये बुमराहने पाठीच्या दुखापतीतून बरे होत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतून पुनरागमन केले होते.

यापूर्वी डिसेंबर 2013मध्ये डर्बन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारतीय संघातील दुसरा कसोटी सामना पार पडला होता. त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने एमएस धोनी (MS Dhoni) नेतृत्व करत असलेल्या भारतीय संघाला 10 विकेट्सने पराभूत केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---