---Advertisement---

बुमराहने वाढवली टीम इंडियाची चिंता! चौथ्या कसोटीत गोलंदाजीदरम्यान घ्यावे लागले होते उपचार

On: शनिवार, सप्टेंबर 4, 2021 11:09 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून (२ सप्टेंबर) सुरू झाला आहे. या सामन्यादरम्यान भारतीय संघासाठी आता एक चिंतेची बातमी समोर आली आहे. भारताचा महत्त्वपूर्ण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला. यामुळे भारतीय संघ आणि विराट कोहली यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

लंडनमधील ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातील ८२ व्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजीसाठी आला होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर बुमराह जखमी झाला. याबाबत एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला. ज्यामध्ये स्पष्ट दिसते की, बुमराहला त्याच्या पायात गुडघ्याखालील भागाला वात आल्यासारखे जाणवले.

मात्र, यानंतर भारताच्या फिजिओने मैदानात येऊन बुमराहचा इलाज देखील केला. त्यानंतर थोड्याच वेळात बुमराहने राहिलेले आपले षटक देखील पूर्ण केले. तसेच नंतर देखील तो गोलंदाजी करण्यासाठी आला होता. अशात बुमराहची ही दुखापत गंभीर नसल्याचे कळते. मात्र, भारतीय व्यवस्थापक बुमराहबाबत खूप सतर्क दिसत आहे.

आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा यूएई आणि ओमान येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. त्याआधी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दुसऱ्या टप्प्याचे देखील आयोजन यूएईमध्ये होणार आहे. आयपीएलमध्ये बुमराह मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. त्यामुळे बुमराहची दुखापत मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघ दोघांना चिंतेत टाकू शकते.

तसेच इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात बुमराहने पहिल्या डावात २१ षटकांची गोलंदाजी केली. ज्यामध्ये त्याचा इकॉनोमी रेट ३.१९ एवढा होता. सोबतच बुमराहने पहिल्या डावात इंग्लंडचे सलामीचे फलंदाज रोरी बर्न्स आणि हसीब हमीदला माघारी धाडत २ विकेट्स देखील घेतल्या होत्या.

दरम्यान, पहिल्या डावात इंग्लंडने २९० धावा केल्या. ज्यामुळे त्यांना ९९ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसर्‍या डावात भारतीय फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. दुसऱ्या दिवसानंतर भारतीय संघाची स्थिती बिनबाद ४३ धावा अशी होते.

महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईकरने गाजवले ओव्हलचे मैदान! इंग्लंडमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा रोहित जगातील पहिलाच सलामीवीर
‘मिस्टर आयपीएल’च्या खणखणीत षटकाराने लुटली मैफील, मागे थांबलेला धोनी बघतच राहिला
जेव्हा शास्त्रींवर चिडून इम्रान संघ सहकाऱ्यांना म्हणाले होते, ‘बाऊन्सर्सचा मारा करुन याचं डोकं फोडा’

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---