इंग्लंडविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना शनिवारी (१७ जुलै) मॅनचेस्टमरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळला जातोय. मालिकेतील पहिला सामना भारताने, तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला आहे. एकदिवसीय मालिका १-१ असा बरोबरीवर असल्यामुळे तिसरा आणि मालिकेतील शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळताना दिसणार नाही. बुमराह या सामन्या न खेळण्याचे कारणही कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार रोहितने भारताची प्लेइंग इलेव्हनविषयी महत्वाची माहिती दिली. प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्वाचा बदल होता, तो म्हणजे जसप्रीत बुमराहचा. पाठीत वेदाना होत असल्यामुळे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या सामन्यात खेळणार नसल्याचे रोहितने सांगितले. शिवाय भविष्याच्या दृष्टीने बुमराहसाठी आराम गरजेचा आहे, याच कारणास्तव त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले गेले नाही, असेही रोहितने स्पष्ट केले.
इंग्लंडच्या पाचव्या कसोटी सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या मोहम्मद सिराजला बुमराहच्या बदली खेळाडूच्या रूपात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली आहे. आता मोहम्मद सिराज या सामन्यात कसे प्रदर्शन करतो, हे पाहण्यासारखे असेल.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील दोन्ही संघ –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंड: जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, रीस टोप्ले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
शेवटच्या निर्णायक वनडे सामन्यात नशीब भारताच्या बाजूने, नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय
रोहित की विराट? कोणी गाजवलंय मँचेस्टरचं मैदान, एका क्लिकवर घ्या जाणून
‘जेव्हा विराट फॉर्ममध्ये येईल, तेव्हा…’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य