यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाहुण्या भारतीय संघात ऍडलेड येथे पहिला कसोटी सामना चालू आहे. या सामन्याच्या पहिल्या डावाअखेर भारतीय संघाने २४४ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियापुढे २४५ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करता आली नाही. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने २० षटकांच्या आतच २ ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूत धाडले.
भारताने आपल्यापुढे ठेवलेल्या लक्ष्याला गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स यांना सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर पाठवले. या दोन्ही फलंदाजांनी मिळून १४व्या षटकापर्यंत संघाची धावसंख्या १६ धावांवर आणली. त्यानंतर डावातील १५वे षटक टाकण्यासाठी भारतीय गोलंदाज बुमराह आला आणि त्याने षटकातील पहिल्याच चेंडूवर मॅथ्यू वेडला पायचित केले.
एवढ्यावरच तो थांबला नाही, तर पुढे डावातील १७व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरही त्याने विकेट घेतली. या षटकातील पहिल्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाज जो बर्न्सला एकही धाव घेता आली नाही. षटकातील शेवटच्या चेंडूवर तरी धाव घ्यावी म्हणून बर्न्स प्रयत्नात होता. पण बुमराहने चपळतेने गोलंदाजी करत बर्न्सला पायचित केले. अशाप्रकारे २० षटकांच्या आतच ऑस्ट्रेलिया संघाने दोन महत्त्वपूर्ण विकेट्स गमावल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs IND Test Live : स्टार्क-कमिन्सच्या भेदक माऱ्याने भारताचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला
‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात टीम इंडियापुढे मोठे आव्हान, ‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर दुखापतीतून बरा