जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराह याचे (Jasprit Bumrah) आयपीएलमध्ये मुंबई इंडीयन्ससोबतच भारतीय संघाच्या यशात मोठे योगदान आहे. आता त्याने रोहित शर्माबाबत मोठे व्यक्तव्य केले आहे. बुमराहने सांगितले आहे की, रोहितला त्याच्या कामगिरीवर नेहमीच विश्वास होता.
आर आश्विनच्या युट्यूब चॅनलवर बोलताना बुमराहने सांगितले की रोहित शर्माने त्याच्या गोलंदाजीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
बुमराह म्हणाला की, “जेव्हा मी संघात (मुंबई इंडियन्स) आलो, तेव्हा रिकी पाॅंटींग कर्णधार होता आणि मी नियमीतपणे खेळत नव्हतो. मी रोहितच्या नेतृत्वाखालीच खेळणे सुरु केले, त्याला माझ्यावर खूप विश्वास आहे. त्याने माझ्यात खूप आत्मविश्वास निर्माण केला. त्याने मला नेटमध्ये गोलंदाजी करताना पाहिले आणि माझ्यात काय कौशल्य आहेत, हे पाहिले, त्यामुळे त्याने सतत माझे समर्थन केले आणि मला नेहमी म्हणाला की स्वत:वर विश्वास ठेव. सुरुवातीच्या काळातही त्याने माझ्यावर खूप विश्वास ठेवला होता म्हणून मला तो महत्त्वाची षटके देत होता.”
जसप्रीत बुमराहने सांगितले की “यामुळे मला वाटले की, मी हे काम करु शकतो. कधी कधी तुम्ही हे मानन्याचा प्रयत्न करता की मी कठीण काम करत आहे आणि हा योग्य निर्णय आहे. परंतु त्याने तुम्हाला अशी कठीण परिस्थीती दिली की, तुम्ही स्वत:च यातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधाल.”(Jasprit Bumrah’s big statement about Rohit Sharma)
साल २०१३ ला आयपीएलमध्ये आणि २०१६ ला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलेला बुमराह आता सर्वोत्तम वेगवान गोलंदाज बनला. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे दोघे आयपीएलमध्ये ५ वेळा विजेतेपद जिंकलेल्या मुंबई इंडीयन्स संघाचे शिलेदार आहेत.
तसेच भारतीय संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. पहिला आणि दुसरा सामना भारतीय संघाने जिंकत मालिका खिशात घातली आहे. रविवारी या दोन उभय संघांमध्ये तिसरा टी२० सामना खेळला जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा कर्णधार आहे, तर जसप्रीत बुमराह उपकर्णधार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हरमनप्रीतच्या झुंजार शतकी खेळीमुळे रोमांचक सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर २ धावांनी विजय
कैफची रोहितला मिडास राजाची उपमा, म्हणाला, ‘त्याला हँडशेक करताना सावध, ज्याला हात लावतोय…’
श्रीलंकेविरुद्धची दुसरा टी२० सामना सॅमसनसाठी ‘या’ कारणामुळे होता खूपच खास