---Advertisement---

युवा जेमीमाचा ऑस्ट्रेलियात डंका, टी२०त धडाकेबाज खेळी करत ‘या’ विश्वविक्रमाला घातली गवसणी

On: शुक्रवार, ऑक्टोबर 8, 2021 3:38 PM
---Advertisement---

भारतीय महीला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. एकमात्र दिवस रात्र कसोटी सामना अनिर्णीत राहिल्यानंतर या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (७ ऑक्टोबर) पार पडला. हा सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाने मजबूत पकड बनवली होती. परंतु पावसाने या सामन्यात अडथळा निर्माण केला, ज्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. दरम्यान भारतीय संघातील विस्फोटक फलंदाज जेमीमा रॉड्रिग्जने एक मोठा कारनामा करत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

जेमीमा रॉड्रिग्जने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात नाबाद ४९ धावांची खेळी करताच टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. असा कारनामा करणारी ती जगातील सर्वात युवा खेळाडू ठरली आहे. जेमीमा रॉड्रिग्जचे वय सध्या २१ वर्ष ३२ दिवस आहे. यापूर्वी असा कारनामा वेस्ट इंडिजची कर्णधार स्टेफनी टेलरने केला होता. तिने हा कारनामा २१ वर्ष आणि १११ दिवस वय असताना केला होता.

भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना, १० व्या षटकात जेमिमाने ही किमया साधली आहे. यासह ती टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण करणारी चौथी भारतीय खेळाडू ठरली आहे. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १ हजार धावा पूर्ण करणारी ती दुसरी खेळाडू ठरली आहे. जेमीमा रॉड्रिग्जने हा पराक्रम अवघ्या ४८ डावात केला आहे. तर मिताली राजने हा कारनामा ४० डावात केला होता.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय महिला खेळाडू
२३६४ धावा – मिताली राज
२२६६ धावा – हरमनप्रीत कौर
१९१८ धावा – स्म्रीती मंधाना
१०२५ धावा – जेमीमा रॉड्रिग्ज*
८२५ धावा – वेदा कृष्णामूर्ती

पावसामुळे सामना अनिर्णीत
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून जेमीमा रॉड्रिग्जने ३६ चेंडुंमध्ये सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान तिने ७ चौकार मारले होते. या सामन्यात भारतीय संघाकडून रेणुका सिंगने पदार्पण केले होते. तर यस्तिका भाटियासाठी हा पहिलाच टी -२० सामना होता. भारतीय संघाने १५.२ षटकात १३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमधून पत्ता कट! टी२० विश्वचषकातही भारताची चिंता वाढवणार

चाहत्याचं कोहलीवरील ‘विराट’ प्रेम, हातात जळता कापूर ठेवून केली आपल्या हिरोची आरती; बघा व्हिडिओ

चाहरच्या खुल्लम खुल्ला प्रपोजच्या भन्नाट योजनेमागचा ‘लव्ह गुरु’ अजून कोणी नव्हे, तर तो धोनीच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---