भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज आता महिला बिग बॅश लीग स्पर्धेच्या आगामी हंगामात खेळताना दिसणार आहे. जेमिमा रॉड्रिग्सने महिला बीबीएलच्या आगामी हंगामासाठी मेलबर्न स्टार्स संघासोबत करार केला आहे. मेलबर्न फ्रॉंचायझीने अधिकृत ट्वीटर खात्यावरून याविषयी माहिती दिली आहे.
🇮🇳 Our first ever Indian player.
Welcome to the #StarsFamily, @JemiRodrigues!
Details ⏬https://t.co/b51jd8eyio pic.twitter.com/5fxqPQyunB
— Melbourne Stars (@StarsBBL) September 6, 2022
जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) महिला बीबीएलमध्ये मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) संघासोबत करार करणारी पहिलीज भारतीय खेळाडू आहे. तिने यापूर्वी बीबीएलच्या सातव्या हंगामात मेलबर्न रेनेगेड्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. रेनेगेड्स संघासाठी खेळताना तिने 116 पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने 333 धावा कुटल्या होत्या. आता आगमी हंगामात खेळण्यासाठी तिने उत्सुकता दर्शवली आहे. “मेलबर्न ऑस्ट्रेलियातील तिचे सर्वात आवडते शहर असून त्याचे प्रतिनिधित्व करताना तिला आनंद होईल”, असे ती म्हणाली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हार्दिकची धुलाई झाल्यावर माजी दिग्गजाला आठवला रविंद्र जडेजा, म्हणाला…
चहलसाठी आता आर-पारची लढाई! फेल ठरला तर थेट संघातून बाहेर
आशिया चषकाच्या विजेत्या संघाची भविष्यवाणी; भारतीय दिग्गजच म्हणतोय, ‘पाकिस्तान विजेता..’