आयपीएल 2023 मध्ये दमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना भविष्यात भारतीय संघात संधी मिळणार असल्याचे बीसीसीआयच्या काही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यातील टी20 मालिकेत त्याला संधी मिळाली नसली तरी, आयर्लंड दौऱ्यात तो भारतीय संघाचा भाग असू शकतो. आयपीएलच्या या हंगामात आपल्या जबरदस्त फटकेबाजीने पंजाब किंग्सच्या अनेक विजयात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या जितेश शर्मा याने नुकतेच एका मुलाखतीत एक मोठे वक्तव्य केले.
यष्टीरक्षक तसेच खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत वेगाने धावा काढण्याचे कौशल्य त्याच्यात आहे. एका मुलाखतीत बोलताना त्याला त्याच्या आदर्शांबाबत विचारले गेले. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला,
“यष्टीरक्षक म्हणून मी ऍडम गिलख्रिस्ट व एमएस धोनी यांना आदर्श मानतो. रोहित शर्मा व विराट कोहली यांना देखील मी अत्यंत जवळून पाहतो. या व्यतिरिक्त अंबाती रायुडू ज्याप्रकारे खेळतो ते देखील पाहणे मला आवडते.”
जितेश शर्मा याने आयपीएल 2023 मध्ये 14 सामन्यांमध्ये 156 पेक्षा जास्तच्या सरासरीने 309 धावा केल्या होत्या. त्याने अनेक सामन्यांमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचे देखील कामगिरी करून दाखवली. आयपीएलच्या मागील हंगामात देखील त्याने काही सामने खेळताना आपल्या आक्रमक फलंदाजीची चुणूक दाखवली होती. अनेक जण त्याला टी20 संघात समाविष्ट करण्याची मागणी करत असतात.
वेस्ट इंडीज दौऱ्यावर त्याला संधी मिळेल अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, त्याला संधी मिळू शकली नाही. त्यानंतर आता होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यावर तो भारतीय संघाचा भाग बनण्याची दाट शक्यता आहे. तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघात देखील त्याचा समावेश होऊ शकतो.
(Jitesh Sharma Said Dhoni Rohit Virat My Idol)
महत्वाच्या बातम्या-
‘विराट FAB 4चा भाग नाही, बाबरचे नाव जोडा…’, माजी भारतीय क्रिकेटपटूचे खळबळजनक विधान
बेअरस्टोसोबत कन्फ्युजन, तरीही हवेत झेप घेत हॅरी ब्रूकने पकडला सुपरमॅन कॅच, तुम्ही पाहिला का?