सध्या ऑस्ट्रेलियन संघ भारताशी चार सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळविला, तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला मात दिली. त्यामुळे आता मालिका रंगतदार स्थितीत आली असून उर्वरित सामने जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे.
ऑस्ट्रेलियाला या मालिकेत महत्वाचा प्रश्न सतावतो आहे तो म्हणजे सलामीवीरांचा. त्यांचा नियमित सलामीवीर डेविड वाॅर्नर दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकला होता तर युवा विल पुकोवस्की देखील सराव सामन्यात दुखापत झाल्याने संघाबाहेर होता. त्यामुळे खराब फॉर्मात असूनही जो बर्न्सला पहिल्या दोन समण्यात संधी मिळाली होती. मात्र त्याला संधीचा लाभ उठवता आला नाही. दोन्ही सामन्यात बर्न्स स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी त्याला ऑस्ट्रेलियाने संघात स्थान दिले नाही. इतकेच नव्हे तर डेविड वाॅर्नर दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसेल तरी सामना खेळेल, असे देखील स्पष्ट केले आहे.
मात्र बर्न्सला वगळण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाला महागात पडण्याची चिन्ह आहेत. ऑस्ट्रेलियन संघातून वगळल्यानंतर बर्न्स ब्रिस्बेन हिट या संघाकडून बिग बॅश लीगमध्ये खेळण्यासाठी गेला. या लीगमधील सिडनी थंडर्स या संघाविरुद्ध झालेल्या आजच्या सामन्यात त्याने तडाखेबंद अर्धशतक झळकाविले. त्याने ३८ चेंडूत ५२ धावा काढताना ५ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर ब्रिस्बेन हिट संघाने सिडनी थंडर्सने दिलेले १७५ धावांचे आव्हान सहज पार केले. त्यामुळे आता बर्न्सला वगळून ऑस्ट्रेलियाने आपल्याच पायावर धोंडा तर पडून घेतला नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे.
5️⃣0️⃣ for @joeburns441
???? #BBL10 pic.twitter.com/qKyEXOwtp7
— cricket.com.au (@cricketcomau) January 4, 2021
अर्थात, बर्न्सला वगळण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाला किती महागात पडेल हे तिसऱ्या सामन्यानंतरच सिद्ध होईल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला ७ जानेवारीपासून सिडनीच्या मैदानात सुरुवात होईल.
महत्वाच्या बातम्या:
– मोठी बातमी- श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघातील ‘या’ खेळाडूचा रिपोर्ट आला कोरोना पाॅझिटिव्ह
– आजच्याच दिवशी मुरलीधरनच्या फिरकीच्या तालावर नाचले होते झिम्बावेचे फलंदाज; थोडक्यात हुकला होता हा विक्रम
– एका शब्दात रोहितची ओळख..? चाहत्याच्या प्रश्नावर पाकिस्तानी दिग्गजाने दिले मन जिंकणारे उत्तर






