---Advertisement---

“रिषभ पंतच्या भितीने घोषित केला नाही पहिला डाव”, इंग्लंडच्या संघनायकाचा मोठा खुलासा

On: मंगळवार, फेब्रुवारी 9, 2021 9:48 PM
---Advertisement---

चेन्नईमध्ये भारतीय संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने २२७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट याने पहिला डाव घोषित का नाही, याबद्दल स्पष्टीकरण दिले. रूटने डाव घोषित न करण्याचे कारण भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत असल्याचे स्पष्ट केले आहे.

इंग्लंड संघाने पहिल्या डावात रूटच्या द्विशतकानंतर ४५० हून अधिक धावांचा आकडा गाठला होता. तरीही त्यांनी डाव घोषित न करता सर्वबाद होईपर्यंत खेळण्याचा निर्णय घेतला. अखेर ५७८ धावांवर इंग्लंड संघ सर्वबाद झाला. त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या ३३७ धावांवर गारद झाला होता. पुढे दुसऱ्या डावातही भारतीय संघाला फॉलोऑन न देता इंग्लंडने फलंदाजी करायचे ठरवले आणि २४२ धावांच्या आघाडीत १७८ धावांची भर पाडत भारतीय संघासमोर ४२० धावांचे आव्हान ठेवले. या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात भारत १९२ धावात करू शकला. परिणामत इंग्लंडने २२७ धावांच्या फरकाने सामना खिशात घातला.

रिषभ पंतमुळे डाव घोषित नाही केला- जो रुट

याविषयी बोलताना रुट म्हणाला की, “आम्ही निश्चितच पहिला डाव लवकर घोषित करू शकलो असतो. परंतु मी हे निश्चीत करू पाहत होतो की, सामन्याचे फक्त दोनच निकाल लागले पाहिजे. तसेच आम्ही जेव्हा मैदानावर गोलंदाजी करण्यासाठी उतरू तेव्हा आमच्या गोलंदाजांना जास्त वेळ मिळायला हवा. कारण त्यांची तयारी झाली पाहिजे. आम्ही ४०० धावांच्या पुढे जाऊन धावांची गती वाढवणार होतो. तसेच हे गरजेचे ही होते की, आमच्याकडे जास्तीत जास्त धावा असाव्यात.”

पुढे तो म्हणाला, “पंतने जर एक सत्र टिकून फलंदाजी केली, तर सामन्याचा कायापालट करू शकतो. आम्हाला गडी बाद करताना धावा वाचवण्याचा दबाव आमच्यावर ओढवून घ्यायचा नव्हता. आम्ही निश्चित करण्याचा प्रयत्न करत होतो की, गोलंदाजांना विकेट्स घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी मिळावी. आम्ही केवळ १० संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो. आम्हाला फक्त त्या संधीचा फायदा घ्यायचा होता. आम्ही सामना लवकर घोषित करू शकलो असतो. पण मी त्यावेळी घेतलेल्या निर्णयाने खुश आहे.”

रिषभ पंतची कामगिरी

रिषभ पंतने पहिल्या डावात आक्रमक खेळी करत ९१ धावा केल्या होत्या. ८८ चेंडूंचा सामना करताना ५ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या उभारली होती. परंतु दुसऱ्या डावात तो अवघ्या ११ धावांवर बाद झाला.

त्याने आतापर्यंत क्रिकेट कारकिर्दीत १७ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ४४.१ च्या सरासरीने ११९० धावा केल्या आहेत. यात त्याने ५ अर्धशतक तर २ शतके झळकावली आहेत. तसेच १६ वनडे सामन्यात २६.७ च्या सरासरीने ३७४ धावा केल्या आहेत. त्याने खेळलेल्या २७ टी२० सामन्यांमध्ये ४१० धावा केल्या आहेत. यात त्याने २ अर्धशतक झळकावली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

वेड क्रिकेटचे! भारत-इंग्लंड कसोटीचे चक्क लग्न सोहळ्यात लाइव्ह-स्ट्रिमिंग, फोटो तूफान व्हायरल

सलग सात डावांत फ्लॉप ठरलेल्या रहाणेबद्दल कर्णधार कोहलीने दिली रोकठोक प्रतिक्रिया, रहाणे म्हणजे…

वाढदिवस विशेष: सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करणारा अवलिया, ज्याला संघ सहकारी म्हणायचे ‘कबूतर’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---