---Advertisement---

सहा पैकी सहा! कर्णधार रुटचा आशिया खंडातही डंका, केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड

On: मंगळवार, फेब्रुवारी 9, 2021 3:42 PM
---Advertisement---

मंगळवारी (९ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियम अर्थात एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.

जो रुटचा हा इंग्लंडचा कर्णधार म्हणून आशिया खंडातील ६ वा कसोटी सामना होता. विशेष म्हणजे या सर्व ६ सामन्यात त्याने विजय मिळवला आहे. त्याने भारताविरुद्ध चेन्नईत कसोटी सामना खेळण्यापूर्वी श्रीलंकेमध्ये २०१८ साली ३ सामने आणि २०२१ साली २ सामने असे मिळून ५ सामने इंग्लंडचा कर्णधार म्हणून खेळले असून हे सर्व सामने त्याने जिंकले आहेत.

त्यामुळे तो आशिया खंडात कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या आशिया खंडाबाहेरील (Non-Asian Captain) कर्णधारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने ऍलिस्टर कूक आणि रिकी पाँटिंग यांना मागे टाकले आहे. पाँटिंग आणि कूक यांनी आशिया खंडात कर्णधार म्हणून प्रत्येकी ५ विजय कसोटी क्रिकेटमध्ये मिळवले आहेत.

या यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ असून त्याने आशिया खंडात कर्णधार म्हणून खेळलेल्या २१ सामन्यांपैकी ८ सामन्यात विजय मिळवला आहेत. तर वेस्ट इंडिजचे महान माजी कर्णधार क्लाईव्ह लॉईड या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी १७ पैकी ७ सामन्यात विजय मिळवला आहे.

आशिया खंडात सलग ६ विजय मिळणारा इंग्लंड दुसरा संघ –

इंग्लंडचा चेन्नई कसोटीतील विजय हा आशिया खंडातील सलग ६ वा विजय होता. त्यामुळे इंग्लंड आशिया खंडात सलग ६ विजय मिळवणारा दुसरा संघ ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने २००२ ते २००४ दरम्यान सलग ७ विजय आशिया खंडात मिळवले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

५० वर्षांपुर्वी जर पैशांचा पाऊस पडला नसता, तर कदाचित ‘वनडे क्रिकेट’चे नावदेखील नसते

सलग ७ विजयांच्या पराक्रमानंतर विराटच्या नेतृत्वाखाली ४ पराभव, झाली नकोशा विक्रमाची नोंद

गांगुली-धोनीसारख्या कर्णधारांना न जमलेला किर्तीमान कोहलीच्या नावावर, ठरला पहिलाच भारतीय कॅप्टन 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---