आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सर्व संघांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे .काही दिवसांपूर्वीच सर्व संघांनी आपल्या रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी देखील जाहीर केली. स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, आरोन फिंच सारख्या खेळाडूंना संघांनी सोडलेले असल्याने आगामी आयपीएल लीलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या विदेशी खेळाडूंसोबतच केदार जाधव, हरभजन सिंग, उमेश यादव सारखे अनेक भारतीय स्टार्स देखील या लिलावात सहभागी आहेत. मात्र याच वेळी एक महत्वाची बातमी समोर असून, इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुटने आयपीएल लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएल लिलावासाठी 1097 खेळाडूंनी केलेल्या अर्जामध्ये रूटचे नाव नसल्याने अनेकांची निराशा झाली. रूट सोबतच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने देखील लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. रूटने मागील काही वर्षात आयपीएल लिलावामध्ये सहभाग घेतला होता, मात्र त्याला कुठल्याही संघाने खरेदी केले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये शानदार फॉर्म मध्ये असलेल्या रुटवर यावेळी लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता होती, मात्र रुटने लीलावामध्ये सहभागी न होण्याचा मोठा निर्णय घेतला.
दरम्यान रुटच्या अलीकडच्या काळातील कामगिरीचा विचार केला असता तो शानदार फॉर्ममध्ये आहे.
रुटने भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात 377 चेंडूत 19 चौकार व 2 षटकारासह 218 धावांची शानदार खेळी केली. रुट सारख्या स्टार खेळाडूच्या अनुपस्थितीमुळे निश्चितच आयपीएल प्रेमींना काहीशी निराशा झाली असेल.
महत्वाच्या बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानकडून ओदीशाचा धुव्वा
राज्य निवडचाचणी कुस्ती स्पर्धेत बीड जिल्ह्यातील पैलवान अमोल मुंढे विजयी! आता गाजवणार पंजाबचं मैदान