---Advertisement---

पहिल्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे ११ जणांचा इंग्लंड संघ, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी

On: गुरूवार, ऑगस्ट 1, 2019 2:16 PM
---Advertisement---

बर्मिंगहॅम। आजपासून(1 ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 1ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान एजबस्टर्न स्टेडियमवर होणार आहे.

या सामन्यासाठी इंग्लंडने त्यांच्या 11 जणांचा संघ घोषित केला आहे. इंग्लंडच्या संघात वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने दुखापतीनंतर पुनरागमन केले आहे.

मात्र जोफ्रा आर्चरला या संघात संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याला इंग्लंडकडून कसोटीत पदार्पण करण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे. याबद्दल इंग्लंडचा कर्णधार जो रुटने सांगितले आहे की आर्चर अजून दुखापतीतून सावरत आहे. तो जेव्हा फिट होईल तेव्हा त्याला संधी दिली जाईल.

तसेच 11 जणांच्या संघात अष्टपैलू म्हणून बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्सला संधी मिळाली आहे. तसेच जेसन रॉयलाही या संघात संधी मिळाली असल्याने रॉय आणि रॉरी बर्न्स सलामीला फलंदाजी करु शकतात. तर रुट तिसऱ्या आणि जो डेन्ली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो.

गोलंदाजीत अँडरसन बरोबरच स्टुअर्ट ब्रॉड हा देखील अनुभवी वेगवान गोलंदाज इंग्लंडच्या 11 जणांच्या संघात आहे. पण सॅम करन आणि ऑली स्टोनला या संघात संधी मिळालेली नाही.

पहिल्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा 11 जणांचा संघ – 

जेसन रॉय, रोरी बर्न्स, जो रूट (कर्णधार), जो डेन्ली, बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

आजपासून सुरु होणाऱ्या ऍशेसबद्दल सर्वकाही…

क्रिकेटच्या इतिहासात… ऍशेस

टीम इंडियाच्या या क्रिकेटपटूने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment