---Advertisement---

जोफ्रा म्हणतोय, “आयपीएलच्या ‘या’ दिवसांना मी कंटाळलोय, मला मुक्त करा”

On: गुरूवार, ऑक्टोबर 29, 2020 8:30 PM
---Advertisement---

आयपीएलच्या राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला बायो बबलमध्ये राहून कंटाळा आला आहे. त्यामुळे बायो बबलमधून मुक्त होईपर्यंत दिवस मोजणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

कोविड-१९ नंतर क्रिकेटच्या प्रत्येक स्पर्धेत बायो बबलचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. त्यानुसार बीसीसीआय आणि आयपीएल गवर्निंग काउंसिलनेही युएईत चालू असलेल्या आयपीएल २०२०मध्ये सहभागी खेळाडूंना बायो बबलच्या बाहेर जाण्याची परवानगी दिलेली नाही. जर कोणत्याही खेळाडूने या नियमाचे उल्लंघन केल्यास त्याला स्पर्धेतून बाहेर केले जाते.

यापुर्वीही राहिला होता बायो बबलमध्ये

त्यामुळे इतर खेळाडूंप्रमाणे जोफ्रा आर्चरही सध्या युएईत बायो बबलमध्ये आहे. तसेच त्याला जुलै महिन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज मालिकवेळी जवळपास ३ महिने बायो बबलमध्ये राहावे लागले होते. मात्र त्याने दूसऱ्या कसोटी सामन्यावेळी या नियमाचे उल्लंघन केले होते, त्यामुळे त्याला दंडही भरावा लागला होता.

बायो बबलमधून व्हायचं आहे मुक्त

याविषयी बोलताना जोफ्रा आर्चर म्हणाला की, “मला आता फक्त या वातावरणातून बाहेर पडायचे आहे. त्यामुळे मी बाहेर पडेपर्यंत दिवस मोजणार आहे. यामुळे वेगाने दिवस जातात असे मला वाटते. खरं तर, अशा परिस्थितीत तुमचे कुटुंब जवळ असल्यास थोडी मदत मिळते.” आर्चरव्यतिरिक्त इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गनही बायो बबलमध्ये मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहण्याविषयी चिंता व्यक्त केली आहे.

आयपीएल २०२०ची आकडेवारी

जोफ्रा आर्चरच्या आयपीएलच्या तेराव्या हंगामातील आकडेवारीला पाहायचं झालं, तर त्याने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. दरम्यान ६.७१च्या इकोनॉमी रेटने त्याने १७ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आम्ही पण चकित झालोय!! IPLच्या १२ वर्षांच्या इतिहासात अन् ८०० सामन्यांमध्ये न घडलेली गोष्ट यंदा घडलीये

दुर्दैव! युवांनाही सट्टेबाजीचे वेड; वाराणसीतून ४ विद्यार्थ्यांसह ११ जणांना अटक

तब्बल १२ शतके ठोकणार्‍या २५ वर्षीय क्रिकेटरने मध्येच सोडली क्रिकेट स्पर्धा, ‘हे’ आहे कारण

ट्रेडिंग लेख-

Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट

SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर

हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---