जागतिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे बाईक प्रेम कोणापासून लपलेले नाही. तसेच बॉलीवुड अभिनेता जॉन अब्राहम देखील बाईकप्रेमी आहे. त्याचबरोबर धोनी आणि जॉन अब्राहम यांच्यात चांगली मैत्री देखील आहे. त्यामुळे अनेकदा हे दोघे एकत्र दिसून आले आहेत.
जॉन अब्राहम भारतात मोटो जीपी चा ब्रँड ॲम्बेसिडर आहे. त्याला नुकताच एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता की जर कोणती रेस झाली तर धोनी आणि त्याच्यापैकी कोण जिंकेल. त्यावर अब्राहमने धोनीचे नाव घेतले. मिड डे ने दिलेल्या एका वृत्तानुसार अब्राहम म्हणाला, ‘धोनीच जिंकेल. तो खूप शूर आहे आणि एक खेळाडू आहे. मी एक अभिनेता आहे. तसेच धोनी एक चांगला बाईक रायडर आहे.’
धोनीकडे आहे अनेक बाईक्सचे कलेक्शन
धोनीच्या रांचीच्या फार्म हाऊसमध्ये बाईक्सचे मोठे कलेक्शन आहे. धोनीने त्याच्या बाईक ठेवण्यासाठी खास मोठे गॅरेज त्याच्या फार्म हाऊसमध्ये उभे केले आहे. यात त्याच्या अनेक नव्या आणि जुन्या बाईक आहेत. अनेकदा धोनी त्याच्या बाईकवरुन फेरफटका मारतानाही दिसतो. काही महिन्यांपूर्वी त्याचा त्याची मुलगी झीवाला घेऊन बाईकवरुन त्याच्याच फार्महाऊस भोवती फेरफटका मारतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.
धोनी आणि अब्राहमची जुनी मैत्री
धोनी आणि अब्राहम अनेक वर्षांपासून चांगले मित्र आहेत. धोनीने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते तेव्हा त्याने आणि अब्राहम, दोघांनीही लांब केस ठेवले होते. त्याकाळात दोघांच्या केसांमध्ये बरेचसे साम्य होते.
धोनी पुन्हा दिसणार क्रिकेटच्या मैदानावर
आयपीएल 2021 चे उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना धोनीला आयपीएलमध्ये पुन्हा खेळताना पाहाता येणार आहे. उर्वरित आयपीएल 2021 हंगामाला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्याने सुरुवात होणार आहे. धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अर्धशतक पूर्ण करताच मोठा फटका मारण्याच्या नादात ‘असा’ बाद झाला रविंद्र जडेजा, पाहा व्हिडिओ
Video: पंतने सलग २ चेंडूत मारले चौकार-षटकार, पण त्यापुढच्याच चेंडूवर झाला ‘असा’ बाद