श्रीलंका क्रिकेट बोर्डाने यंदा पहिल्यांदाच लंका प्रीमियर लीगचे आयोजन केले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच होत असलेल्या लंका प्रीमियर लीग मध्ये पाच संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील सर्व 23 सामने 27 नोव्हेंबर ते 17 डिसेंबरच्या दरम्यान खेळले जातील. या सर्व सामन्याचे आयोजन हंबनटोटा येथे करण्यात आले. मात्र ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अनेक समस्या उद्भवत आहेत. यामध्ये बर्याच वरीष्ठ खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतली. तसेच काही खेळाडू कोरोनाने संक्रमित आढळले आहेत.
वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक व फलंदाज जाॅनसन चार्ल्सला लंका प्रीमियर लीगसाठी जाफना स्टॅलियन्स संघात सामील करून घेण्यात आले आहे. त्याला रवि बोपाराच्या जागी संघात स्थान देण्यात आले. लंका प्रीमियर लीग मधून माघार घेणारा रवि बोपारा हा पहिलाच खेळाडू नाही. यापूर्वीही विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी यंदाच्या हंगामातून आपली नावे माघारी घेतली आहेत.
चार्ल्सला घ्यावी लागणार वेस्ट इंडिजची परवानगी
रवि बोपाराची जागा घेत असलेल्या जाॅनसन चार्ल्सला मात्र नुकत्याच आलेल्या अहवालानुसार लंका प्रीमियर लीग खेळण्यासाठी वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाच्या एनओसीची (ना हरकत प्रमाणपत्र) वाट पहावी लागणार आहे. त्यानंतरच तो श्रीलंकेत दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लंका प्रीमियर लीगसाठी जाफना स्टॅलियन्स संघात सहभागी होणारा जाॅनसन चार्ल्स हा सहावा विदेशी खेळाडू असेल. यापूर्वी शोएब मलिक(पाकिस्तान) , उस्मान शिनवारी (पाकिस्तान), काइल एबाॅट(दक्षिण आफ्रिका), डुआने ओलिवर(दक्षिण आफ्रिका) आणि टॉम मूर्स (इंग्लंड) इत्यादी विदेशी खेळाडू संघात सहभागी झाले आहेत.
जॉनसनने त्याच्या ट्वेंटी-ट्वेंटी कारकिर्दीत 176 सामने खेळले असून त्याने 1 शतक आणि 26 अर्धशतकांसह 4240 धावा केल्या आहेत.
भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुद्धा या लीग मध्ये खेळताना दिसतील
लंका प्रीमियर लीग बद्दल बोलायचं झालं तर या स्पर्धेत काही माजी भारतीय दिग्गज खेळाडूसुद्धा भाग घेत आहेत. या स्पर्धेत भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल खेळताना दिसेल. मुनाफ पटेल कँडी टस्कर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळेल, त्याच्याबरोबर इरफान पठाण देखील या संघासाठी खेळणार आहे.
काही खेळाडूंना स्पर्धेपूर्वी कोरोनाची लागण
यंदा सर्व स्पर्धांवर कोरोनाचा परिणाम झालेला बघायला मिळत असून, मात्र आता पहिल्यांदाच होणार्या लंका प्रीमियर लीगवर कोरोनाचे काळे ढग एकवटत आहेत. त्याचबरोबर लंका प्रीमियर लीग मध्ये भाग घेत असलेल्या दोन खेळाडूंना या महामारीची लागण झाली आहे. यामध्ये पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज सोहेल तन्वीर आणि कॅनडाचा रविंद्रपाॉल सिंह या स्पर्धेला सुरुवात होण्याअगोदरच कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अहवालानुसार सोहेल तन्वीर आणि रविंद्रपाॉल सिंह हे दोघेही आता एका हॉटेलमध्ये वेगळ्या ठिकाणी क्वारंटाइन आहेत. लंका प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी सोहेल तन्वीर हा कँडी टस्कर्स संघाचा भाग आहे, तर रविंद्रपाॉल सिंह कोलंबो किंग्ज संघाचा खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“चेन्नई सुपर किंग्जने सर्व खेळाडूंना संघातून मुक्त करावे”, दिग्गजाचे खळबळजनक विधान
विराटविरुद्ध ‘हा’ खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचं महत्वाचं शस्त्र
सेहवाग करतोय पुनरागमन, ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दिसणार ‘या’ भूमिकेत