इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मंगळवारी त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला. स्टोक्सच्या या निर्णयावर अनेक क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले, तर काहींनी दु:ख व्यक्त केले. त्यानंतर, आता इंग्लंड संघाचा दुसरा प्रमुख खेळाडू जॉनी बेअरस्टो यानेदेखील एक मोठे वक्तव्य केले आहे.
स्टोक्सने घेतली वनडेतून निवृत्ती
२०१९ विश्वचषकात इंग्लंडला विजेता बनवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणे त्याच्यासाठी अशक्य असल्याचे त्याने म्हटले होते. त्याच्या या निर्णयानंतर अतिक्रिकेटबाबत चांगली चर्चा होतेय.
बेअरस्टोचे महत्वपूर्ण विधान
स्टोक्सने क्रिकेटच्या अतिरेकाचे कारण देत वनडे क्रिकेट सोडले. त्याचवेळी त्याचा संघ सहकारी असलेल्या जॉनी बेअरस्टो याने याच विषयाला अनुसरून एक महत्त्वपूर्ण विधान केले. तो म्हणाला,
“नक्कीच खेळाडूंपुढे आहेत. मात्र, मी शक्य तितका वेळ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळण्याचा आनंद घेईल. जसा वेळ जाईल तसा निर्णय घ्यावा लागतो. परंतु, सध्या तरी मी क्रिकेटच्या प्रत्येक प्रकाराचा आनंद घेतोय आणि ते खेळत राहील. क्रिकेटचा प्रत्येक प्रकार भिन्न आणि रोमांचक आहे.”
बेअरस्टो मागील काही काळापासून अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. खास करून कसोटी क्रिकेटमध्ये त्याने सलग तीन सामन्यात शतके ठोकलीत. त्याचबरोबर तो वनडे व टी२० क्रिकेटही सातत्याने खेळतोय.
इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार जोस बटलरने यापूर्वी सांगितले होते की, तो पुन्हा कसोटी संघात सामील होताना दिसत नाही. बटलरच्या खांद्यावर फलंदाजी, यष्टिरक्षण आणि संघांचे नेतृत्व या जबाबदाऱ्या आहेत. खेळाच्या सर्व प्रकारत पूर्ण ताकदीचा इंग्लंड संघ पाहण्यासाठी प्रदीर्घ काळापासून वाट पाहणाऱ्या, इंग्लंडच्या चाहत्यांसाठी बेअरस्टोचा हा निर्णय आनंद देणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडीजविरुद्धच्या लाईव्ह सामन्यात कर्णधार धवनने केले ‘हे’ कृत्य, समालोचकांच्याही बत्त्या गुल
‘हाफ पँट’वर क्रिकेट, नको रे बाबा! पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चहलचे मजेशीर प्रत्युत्तर
भावा, विराटने टी२० विश्वचषक खेळलाच पाहिजे! भारताच्या दिग्गजाने बोलून दाखवलेच