ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात गुरुवारी (10 नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड (INDvENG) यांच्या दरम्यान दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. भारतीय संघाने उभारलेल्या 168 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने आपल्या दोन्ही सलामीवीरांच्या शानदार खेळाचा जोरावर भारताला 10 गड्याने पराभूत करत अंतिम फेरीत जागा मिळवली. इंग्लंड तिसऱ्यांदा टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळेल. उपांत्य फेरीत इंग्लंडच्या विजयाचे नायक राहिलेल्या जोस बटलर व ऍलेक्स हेल्स या सलामीवीरांनी आपल्या भागीदारी दरम्यान एक विश्वविक्रम देखील आपल्या नावे केला.
भारतीय संघाने विजयासाठी ठेवलेल्या 169 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर व ऍलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांना संधी दिली नाही. अगदी पहिल्या षटकापासून त्यांनी भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केले. त्यांनी अवघ्या 16 षटकात सामन्याचा निकाल लावत नाबाद 170 धावांची भागीदारी केले. बटलरने 49 चेंडूवर 9 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 80 धावा ठोकल्या. दुसऱ्या बाजूने हेल्सने त्याहीपेक्षा जोरदार फलंदाजी करत 47 चेंडूवर नाबाद 86 धावांचा तडाखा दिला. यात 4 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता.
बटलर-हेल्स या जोडीने फटकावलेल्या 170 धावा या टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च भागीदारी ठरली. त्यांनी याच विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक व रायली रुसो या जोडीने बांगलादेशविरुद्ध केलेल्या 168 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी श्रीलंकेचे कुमार संगकारा व माहेला जयवर्धने आहेत. त्यांनी 2010 विश्वचषकात वेस्ट इंडीजविरुद्ध ही भागीदारी केलेली. तर, चौथ्या स्थानी पाकिस्तानचे बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी भारताविरुद्ध मागील विश्वचषकात केलेली 152 धावांची भागीदारी आहे. (Jos Buttler And Alex Hales World Record Partnership)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप जिंकला नसला, तरी ‘किंग’ कोहलीमुळे कोट्यवधी भारतीय विसरणार नाहीत हा विश्वचषक; कसं ते वाचा
मोठी बातमी! भारतात क्रिकेटचा पाया रचणारा दिग्गज हरपला, चाहते दु:खात