---Advertisement---

अफलातून! सर्वाधिक आयपीएल शतके करणाऱ्यांमध्ये जोस बटलरने गाठला ‘हा’ क्रमांक, डिविलियर्सलाही पछाडलं

Jos-Buttler-IPL
---Advertisement---

इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर आयपीएलच्या १५व्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. राजस्थान रॉयल्ससाठी बटलरने सुरुवातीच्या ७ सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली आहे. शुक्रवारी (२२ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना देखील त्याने संघासाठी सर्वोत्तम फलंदाजी करत शतक ठोकले. बटलरने शतकी खेळीच्या जोरावर राजस्थानची धावसंख्या २०० धावांच्या पार नेली.

आयपीएल २०२२ हंगामात जोस बटलर (Jos Buttler) त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे. राजस्थआन रॉयल्ससाठी त्याने चालू हंगामातील सुरुवातीच्या ७ सामन्यांमध्ये ३ वेळा शतकी खेळी केली आहे. राजस्थान आणि दिल्ली (RR vs DC) यांच्यातील या सामन्यात त्याने ६५ चेंडूत ११६ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ९ चौकार आणि ९ षटकार निघाले. बटलरचे चालू हंगामातील हे तिसरे आणि आयपीएल कारकीर्दीतील चौथे शतक ठरले.

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांचा विचार केला, तर बटलर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेलने आयपीएलमध्ये एकूण ६ शतके केली आणि तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आहे. विराटने आयपीएलमध्ये ५ शतके केली आहेत. आता बटलर चार शतकांसह या यादीत तिसरा सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू बनला आहे.

https://twitter.com/rajasthanroyals/status/1517526966559158272

बटलर, डेविड वॉर्नर आणि शेन वॉटसन यांच्या नावावर प्रत्येकी चार आयपीएल शतकांची नोंद आहे. हे तिघेही या यादीत संयुक्तरीत्या बरोबरीवर आहेत. त्यानंतर केएल राहुल आणि एबी डिविलियर्स यांच्या नावार प्रत्येकी तीन आयपीएल शतकांची नोंद आहे आणि हे दोघे देखील बरोबरीवर आहेत. बटलरने दिल्लीविरुद्ध केलेल्या शतकानंतर तो आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा चौथा विदेशी खेळाडू ठरला आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २ विकेट्सच्या नुकसानावर २२२ धावा केल्या. यामध्ये बटलरच्या शतकी खेळीव्यतिरिक्त सलामीवीर देवदत्त पडिक्कल याचाही समावेश आहे. पडिक्कलने ३५ चेंडूत ५४ धावा ठोकल्या.

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज
६ शतके- ख्रिस गेल
५ शतके- विराट कोहली
४ शतके- जोस बटलर*
४ शतके- डेविड वॉर्नर
४ शतके- शेन वॉटसन
३ शतके- संजू सॅमसन
३ शतके- केएल राहुल
३ शतके- एबी डिविलियर्स

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज
६ शतके- ख्रिस गेल
४ शतके- शेन वॉटसन
४ शतके- जोस बटलर*
४ शतके- डेविड वॉर्नर
३ शतके- एबी डिविलियर्स

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मैदानात पाय टाकताच कर्णधार सॅमसनचा भन्नाट विक्रम; बनला राजस्थानचा ‘रॉयल’ खेळाडू

गुजरातच्या खेळाडूंना झालं तरी काय? सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत सत्य आले समोर

मला आता पळून धावा काढाव्या लागत नाहीत; पृथ्वी शॉच्या ‘धडाकेबाज सलामी शो’वर फिदा झाला वॉर्नर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---