---Advertisement---

टी२० विश्वचषकात बटलरचे खणखणीत शतक, सामन्यानंतर सांगितले आपल्या ‘विक्रमी’ खेळीमागचे रहस्य

On: मंगळवार, नोव्हेंबर 2, 2021 9:18 AM
---Advertisement---

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सोमवारी (१ नोव्हेंबर) इंग्लंड आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने होते. या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच इंग्लंड संघातील खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. विजयाची हॅटट्रिक केल्यानंतर श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात २६ धावांनी विजय मिळवत इंग्लंड संघाने उपांत्यफेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. दरम्यान या डावात शतक झळकावणाऱ्या जोस बटलरने सामना झाल्यानंतर मोठा खुलासा केला आहे.

जोस बटलरने या सामन्यात डावाची सुरुवात करताना ६७ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ६ षटकारांचा साहाय्याने १०१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाला २० षटकअखेर ४ बाद १६३ धावा करण्यात यश आले होते. या खेळीबाबत बोलताना जोस बटलर म्हणाला की, “मी संयम पाळला म्हणून मी खेळी खेळू शकलो. सुरुवातीला अडचणी आल्या होत्या, परंतु मॉर्गनसोबतची भागीदारी चांगली ठरली. या खेळीपट्टीवर फिरकी गोलंदाजांचा सामना करणे कठीण जात होते. परंतु आम्ही फलंदाजीचा पुरेपूर आनंद घेतला.”

तसेच षटकार खेचून शतक पूर्ण करण्याबाबत तो म्हणाला की, “मी अंदाज लावत होतो की, तो कसा चेंडू टाकेल. त्यावेळी मी शांत होतो. परंतु बराच वेळ खेळपट्टीवर टिकून राहिल्यामुळे मी तो शॉट खेळू शकलो.” या शतकी खेळीसह जोस बटलर इंग्लंड संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

इंग्लंड संघाचा जोरदार विजय 
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरने नाबाद १०१ धावांची खेळी केली. तर कर्णधार ओएन मॉर्गनने ४० धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाला २० षटक अखेर ४ बाद १६३ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाकडून वाहिंदू हसरंगाने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली. तर भानुका राजपक्षेने २६ धावांचे योगदान दिले. परंतु श्रीलंका संघाला हे आव्हान पूर्ण करण्यात अपयश आले. या सामन्यात इंग्लंड संघाने २६ धावांनी विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

जॉस द बॉस; श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकत ‘या’ विक्रमात बनला इंग्लंडचा नंबर १ सलामीवीर

श्रीलंकेविरुद्ध बटलरची बॅट तळपली! डावाच्या अखेरच्या चेंडूवर षटकारासह शतक पूर्ण करत विक्रमांना घातली गवसणी

टी२० विश्वचषक: श्रीलंकेवर २६ धावांनी विजयासह इंग्लंडने सेमीफायनलचे तिकीट केले पक्के

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---