---Advertisement---

“भारत हा एक विशेष देश आहे, जो यावेळी…”, जॉस बटलरचा आयपीएल सोडताना भावूक संदेश

On: गुरूवार, मे 6, 2021 3:57 PM
---Advertisement---

भारतात गेल्या वर्षापासून थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा अखेर आयपीएल 2021 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनामुळे अखेर आयपीएल 2021 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. खरं तर सुरुवातीपासूनच आयपीएलच्या आयोजनासंदर्भात कोरोनाची भीती वर्तवली जात होती. त्यात स्पर्धा सुरु असताना बायोबबलमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने खेळाडूंमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण असल्याची चर्चा होती. अखेर बीसीसीआय व आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

आयपीएल स्पर्धा कोरोना मुळे रद्द होणे व भारतातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्ययेबद्दल संपूर्ण जगभरातून भारतासाठी प्रार्थना केली जात आहे. आता यामध्ये इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जॉस बटलर याचे देखील नाव जोडले गेले आहे. बटलरने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बटलरने ट्विटमध्ये लिहिले की, ‘भारत हा एक विशेष देश आहे, जो यावेळी मोठ्या संकटातून जात आहे. माझं आणि माझ्या कुटुंबाच नेहमीप्रमाणेच स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. कृपया सुरक्षित रहा व एकमेकांची काळजी घ्या.’

बटलर आयपीएल स्थगित झाल्यानंतर बुधवारी आपल्या मायदेशी परतला आहे.

https://twitter.com/josbuttler/status/1390000046234558470

बटलर पूर्वी इंग्लंडचा माजी दिग्गज खेळाडू व वर्तमान समालोचक केविन पीटरसन याने देखील भावनिक ट्विट केले होते. पीटरसनने ट्विट मध्ये लिहिले, “भारत – ज्या देशावर मी इतके प्रेम करतो त्या देशाची अशी अवस्था बघून माझे हृदय द्रवले आहे. तुम्ही नक्कीच यातून बाहेर पडून आणखीच सशक्त बनाल. तुमची दया भावना या कठीण काळात देखील दिसून येते.”

https://twitter.com/KP24/status/1389501826148573184

बटलर व पीटरसनप्रमाणे अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींनी भारतासाठी प्रार्थना केलेली दिसून येते. आयपीएल 2021 स्पर्धा रद्द झाल्याने आता विदेशी खेळाडू व समालोचन करत असलेल्या अनेकांना आपल्या देशात जाण्यासाठी काही प्रमाणात कष्ट घ्यावे लागणार आहेत. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की बीसीसीआय आयपीएल 2021 संदर्भात आगामी काळात कोणता निर्णय घेते.

महत्त्वाच्या बातम्या –

मॅन ऑन मिशन! आयपीएल स्थगित झाल्यानंतर विराटने कोरोनाच्या काळात ‘हे’ महत्वाचे कार्य घेतले हाती

धोनीचा आणखी एक कौतुकास्पद निर्णय! सगळे खेळाडू घरी सुरक्षित परतल्यावर मगच जाणार रांचीला

अवघ्या २० लाखात संधी मिळाले खेळाडू, ज्यांनी यंदाच्या आयपीएल हंगामात केली बहारदार कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---