आज प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामातील चौदावा सामना यू मुंबा आणि दबंग दिल्ली मध्ये होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार अनुप कुमार आणि इराण संघाचा कर्णधार मेराज शेख हे वल्डकप २०१६ च्या अंतिम सामन्यांनंतर प्रथमच आमने सामने येणार आहेत.
अनुप कुमारच्या संघाचा हा तिसरा सामना आहे, पहिला सामना त्याचा पुणेरी पलटण बरोबर झाला त्यात यु मुंबाला हार पत्करावी लागली होती. हरियाणा बरोबरच्या सामन्यात मुंबईला निसटता विजय मिळाला होता.
तर दुसऱ्या बाजूला मेराज शेख आणि दबंग दिल्ली दोघेही लयीत दिसत नाहीये. आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यात दिल्लीच्या पदरी हार पडली आहे. दबंग दिल्ली हा एकमेव संघ आहे जो आतापर्यंत एकदा ही उपांत्य फेरी गाठू शकला नाहीये.
यू मुम्बाची जमेची बाजू म्हणजे त्यांचा कर्णधार अनुप कुमार, तो संघासाठी रेडेर बरोबरच डिफेंडरची ही भूमिका बजावतो. काशी, मदने आणि शब्बीर यांच्याकडून संघाला आणखीन सातत्याची अपेक्षा आहे. दिल्ली त्याचा कर्णधार मेराज आणि डिफेंडर निलेश शिंदे व बाजीराव होडगे यांची फॉर्ममध्ये येणाची वाट बघत आहे.
संभाव्य संघ
यू मुंबा
१ अनुप कुमार -(कर्णधार) रेडर
२ शब्बीर बापू-रेडर
३ काशीलिंग आडके -रेडर
४ नितीन मदने -रेडर
५ कुलदीप सिंग -ऑलराऊंडर
६ हादी ओश्तोराक -राइट कॉर्नर
७ जोगिंदर नरवाल -लेफ्ट कॉर्नर
दबंग दिल्ली
१. मेरज शेख (कर्णधार)
२. अॅफोफॅझल माघसूदनलू
३. नीलेश शिंदे
४. बाजीराव होडगे
५. रोहित बलिया
६. आनंद पाटील
७. सुनील