जगभरात पसरलेल्या कोविड-१९ या महामारी दरम्यान भारतीय क्रिकेटपटू आयपीएलद्वारे मैदानावर पुनरागमन करणार आहेत. रविवारी पार पडलेल्या आयपीएल गवर्निंग काउंसिलच्या बैठकीत आयपीएल सामन्यांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारे आयपीएल २०२० आता १९ सप्टेंबरपासून भारताबाहेर युएईत खेळण्यात येणार आहे. तर, आयपीएलचा अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
जवळपास गेल्या ४ महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे घरात वेळ घालवणारे खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहेत. यामध्ये केवळ भारतीयांचा नव्हे तर परदेशी खेळाडूंदेखील समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनने आयपीएलबाबत आपल्या मनातील गोष्ट सांगितली. रिचर्डसन म्हणाला की, “तो आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळण्यासाठी खूप उत्साही आहे. त्याला बघायचे आहे की, अशी कोणती गोष्ट आहे जी विराटला महान बनवते.” Kane Richardson Is Excited To Play Under Virat Kohli Captaincy
२०१९ साली पार पडलेल्या आयपीएल लिलावात आरसीबीने रिचर्डसन, क्रिस मॉरिस, ऍरॉन फिंच, डेल स्टेन, जोशुआ फिलिप आणि इशुरु उडाना अशा खेळाडूंना आपल्या संघात सहभागी केले आहे. न्यूज एजेन्सी एएनआयशी बोलताना रिचर्डसन म्हणाला की, “तो विराटच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यासाठी उत्सुक आहे. कारण, त्याच्याकडे खूप काही शिकण्यासारखे आहे. विराट आणि एबी डिविलियर्स हे दोन्ही खेळाडू सर्वात महान क्रिकेटपटू आहेत. यांच्याकडून काहीही शिकणे हे माझ्या कारकिर्दीत मला मिळालेले बोनस असेल. विराटसारखे प्रतिस्पर्धी खेळाडू क्रिकेटजगतात खूप कमी आहेत.”
रिचर्डसन त्याच्या आयपीएल कारकिर्दीत यापुर्वी २०१६ साली आरसीबी संघाचा भाग होता. त्यावेळी त्याने पूर्ण हंगामात ४ सामने खेळत ७ विकेट्स चटकावल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमधील संघांना दुबईमध्ये पोहोचल्यानंतर इतके दिवस राहावे लागणार आहे क्वारंटाइन
पुण्याच्या इब्राहिमची इंडियन रेसिंग चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत आघाडी
ट्रेंडिंग लेख –
विराट-धोनी सारखे दिग्गजही युएईत ठरलेत फ्लॉप, पण ‘या’ ३ कर्णधारांनी नोंदवलाय हा खास विक्रम
४ दिग्गज क्रिकेटर, जे मुंबई इंडियन्सकडून खेळताना ठरले फ्लॉप
आयपीएलमध्ये खेळाडू आणि कर्णधार म्हणून सुपर डुपर फ्लॉप ठरलेले ४ दिग्गज