आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला एका दमदार वेगवान गोलंदाजाची चांगलीच उणीव भासली. जसप्रित बुमराह दुखापतग्रस्त असल्याने विश्वचषक खेळू शकला नाही. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी यांच्या गोलंदाजीमध्ये बुमराह इतका वेग नाही. अशातच बऱ्याच क्रिकेट जाणकारांकडून एक प्रश्न उपस्थित करण्यात आला की, उमरान मलिक याला संघात स्थान का देण्यात आली नाही. उमरानने आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना खूप नाव कमवलं आहे. आयपीएलमध्ये केन विलियम्सन याच्या नेतृत्वाखाली खेळताना त्याने आपल्या गोलंदाजीचा प्रभाव कर्णधारावर टाकला.
भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. ज्यात त्यांना 3 टी20 सामने आणि 3 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. या दौऱ्यावर उमरान मलिक (Umran Malik) याला टी20 आणि एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. केन विलियम्सन (Kane Williamson) भारताविरुद्ध मालिकेच्या आधी उमरान बद्दल म्हणाला की,”उमरान मलिक एक प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्या चेंडूचा वेग भारतीय संघासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. त्याला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर बघून आनंद होतोय.”
केन पुढे म्हणाला की,”मला वाटते की, जेव्हा तुमच्या संघातील एका वेगवान गोलंदाजाकडे 150 किमी प्रति तास या वेगाने चेंडू फेकण्याची क्षमता असते , ही खूप शानदार गोष्ट आहे. संघात त्याची उपस्थिती असल्याने मला समजत आहे की तो संघामध्ये दीर्घकाळ राहावा अशी संघाची त्याच्याकडून अपेक्षा आहे. अशा दौऱ्यांवर त्याला खेळण्याची जास्त संधी मिळाली तर तो अधिक चांगला क्रिकेटर बनेल. ”
टी20 विश्वचषकामध्ये भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना उपांंत्य फेरीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. विश्वचषकातील पराभवानंतर पहिल्यांदाच हे संघ एकमेकांना भिडतील. या दौऱ्यावर वेगवान गोलंदाज म्हणून संधी मिळालेल्या उमरान मलिकवर सगळ्यांच लक्ष असणार आहे.(Kane Williamson has commented on Umran Malik)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकापासून रोहितकडे पाहतोय पाकिस्तानी दिग्गज; म्हणाला, ‘विराटने संघात बदल केला, पण…’
टेनिस कोर्टवरही धोनीचाच जलवा! नामांकित स्पर्धेत घातली थेट विजेतेपदाला गवसणी