Paris Olympic 2024 :- बॉलीवूड अभिनेत्री व नुकतीच लोकसभा निवडणूक लढवून खासदार झालेली कंगना राणावत ही आपल्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखली जाते. तिच्या या स्वभावामुळे अनेकदा ते वादात देखील सापडते. आता अशाच तिच्या एका वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक खेळांना तिने यावेळी लक्ष्य केले.
खेळांचा कुंभमेळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऑलिंपिक खेळांना 26 जुलै रोजी पॅरिस येथे सुरुवात झाली. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच मुख्य स्टेडियममध्ये उद्घाटन सोहळा आयोजित केला गेला नव्हता. पॅरिसच्या सीन नदीवर सर्व सहभागी देशांची परेड झाली. यादरम्यान अनेक कार्यक्रम देखील आयोजित केले गेले होते. त्यातीलच एका कार्यक्रमावर कंगनाने भाष्य करत आपली नाराजी व्यक्त केली.
कंगना हीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत या उद्घाटन सोहळ्यातील ‘द लास्ट सपर’ या कार्यक्रमावर टीका केली. त्या कार्यक्रमात एका लहान मुलाला समाविष्ट केले गेल्याने तिने ही टीका केली आहे. तिने म्हटले, ‘द लास्ट सपर’या कार्यक्रमात तुम्ही एका लहान मुलाला सहभागी करून घेतले. इतकेच नव्हे तर तिथे एका व्यक्तीला विना कपड्याचे दाखवले. त्याच्या अंगाला केवळ निळा रंग लावून तुम्ही त्याला येशू म्हणून दाखवता. पूर्ण स्पर्धा तुम्ही डाव्या विचारसरणीच्या लोकांनी आपल्याकडे घेतली आहे.’
तिने अन्य एक फोटो पोस्ट करत लिहिले, ‘मी होमोसेक्शुलीटी विरोधात नाही. मात्र, तुम्ही त्याला तुमच्या देशाची ओळख म्हणून का दाखवता? तुम्हाला या गोष्टी तुमच्या बेडरूमपर्यंत ठेवता येत नाहीत का?’
तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे, तसेच काहींनी विरोध देखील दिला आहे. या स्पर्धा 27 जुलै ते 11 ऑगस्ट पर्यंत खेळल्या जातील. यावेळी भारताचे तब्बल 117 खेळाडू ऑलिंपिकमध्ये सहभागी झाले आहेत.
हेही वाचा –
पॅरिसच्या सीन नदीवर फडकला तिरंगा, 2024 ऑलिम्पिक खेळांना धडाक्यात सुरुवात
केएल राहुलचा राऊडी अंदाज! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी उडवलं ‘फायटर प्लेन’; VIDEO व्हायरल
देशाला लवकरच मिळणार गुड न्यूज! भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक जवळपास निश्चित