भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांनी सध्याच्या पिढीतील महान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. माजी भारतीय कर्णधार म्हणाले की, एका पिढीतील खेळाडूंची तुलना दुसऱ्या पिढीतील खेळाडूंशी होऊ शकत नाही. नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात बुमराहला दुखापत झाली होती.
या मालितकेत बुमराहने मालिकेत सर्वाधिक 32 विकेट्स घेतल्या, ज्यासाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ हा किताब देण्यात आला. सध्याच्या पिढीत महान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहचा समावेश आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना कपिल देव म्हणाले, “कृपया (माझी आणि बुमराहची) तुलना करू नका. तुम्ही एका पिढीची दुसऱ्या पिढीशी तुलना करू शकत नाही. आजकालची मुले एका दिवसात 300 धावा करतात, जे आपल्यावेळी शक्य नव्हते. म्हणून तुलना करू नका.”
याशिवाय कपिल देव यांनी बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल सांगितले. कपिल देव म्हणाले, “कामाचा ताण ते काय? त्याने मालिकेत किती षटके टाकली? सुमारे 150 षटके टाकली. पण किती सामन्यांमध्ये आणि किती डावांमध्ये त्याने ही षटके टाकली? पाच सामने आणि नऊ डाव, बरोबर? ते पण त्याने कधीही एका वेळी 15 पेक्षा जास्त षटके टाकली नाहीत. त्याने एक-एक स्पेलमध्ये गोलंदाजी केली. मग ती मोठी गोष्ट आहे का?वर्कलोड मॅनेजमेंट हे मुर्खपणाचे आहे. हे ऑस्ट्रेलियन शब्द आहे. जे ऑस्ट्रेलियन लोकांनी बनवले आहेत.”
जसप्रीत बुमराहने आतापर्यंत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 45 कसोटी, 89 एकदिवसीय आणि 70 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 86 कसोटी डावांमध्ये 19.40 च्या सरासरीने 205 बळी घेतले आहेत. याशिवाय 88 एकदिवसीय डावांमध्ये बुमराहने 23.55 च्या सरासरीने 149 विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी 6/19 अशी होती. उर्वरित 69 टी20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये त्याने 17.74 च्या सरासरीने 89 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा-
इंग्लंड मालिकेपूर्वी नितीश रेड्डी तिरुपती मंदिरात, गुडघ्यावर पायऱ्या चढले; पाहा VIDEO
Champions trophy 2025; या दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा, मोठी अपडेट समोर
664 ची सरासरी, 5 शतके! विजय हजारे स्पर्धेत स्टार खेळाडूचा धुमाकूळ, टीम इंडियात कमबॅक करणार?