---Advertisement---

भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरु

---Advertisement---

भारताचे पहिले विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांना हृदविकाराचा झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार त्यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात आली आहे. पण अजून त्यांच्या तब्बेतीबद्दल आणखी माहिती समोर आलेली नाही.

त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या वृत्ताची पत्रकार टिना ठाकर यांनी पुष्टी केली. त्यांनी ट्विट केले होते की ‘दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर दिल्ली येथील एका हॉस्पिटलमध्ये एंजिओप्लास्टी करण्यात आली आहे. ते लवकर बरे व्हावेत.’

कपिल देव हे महान भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. त्यांची गणना जगातील दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ साली लॉर्ड येथे पहिल्यांदा विश्वविजेतेपद जिंकले होते.

त्यांनी भारताकडून १९७९ चे १९९४ पर्यंत १६ वर्षे क्रिकेट खेळले. यात त्यांनी अनेक अविश्वसनीय खेळी केल्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अष्टपैलू कामगिरी करताना वनडेमध्ये २२५ सामन्यात २५३ विकेट्स आणि ३७८३ धावा केल्या आहेत, तर कसोटीमध्ये १३१ सामन्यात ४३४ विकेट्स आणि ५२४८ धावा केल्या आहेत.

निवृत्तीनंतर त्यांनी १९९९ ला भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले होते. तसेच मागील अनेक वर्षांपासून ते समालोचन करताना दिसले आहेत.

वाचा – 

-क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलम‌ॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले

-शशी कपूर यांना लॉर्ड्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी कपिल देव यांनी केली अशी आयडिया…

-वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---