सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीन काव्या मारन आयपीएल 2023 च्या मिनी लिलावासाठी कोचीमध्ये उपस्थित होती. शुक्रवारी (23 डिसेंबर) पार पडलेल्या या लिलावात खेळाडूंवर पैशाचा पाऊस पडला. इंग्लंडचा मध्यक्रमातील फलंदाज हॅरी ब्रूक याला सनरायझर्स हैदराबादने 13.25 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. ही बोली जिंकल्यानंतर काव्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला आणि ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेट होऊ लागली.
काव्या मारन यापूर्वी देखील अनेकदा लाईव्ह सामन्यात किंवा आयपीएल लिलावात उपस्थित राहिली आहे. शुक्रवारी देखील तिने लिलावासाठी स्वतः उफस्थिती लावली आणि संघासाठी खेळाडू खरेदी केले. हैदराबाद संघाकडे या लिलावात इतर सर्व संघांपेक्षा सर्वाधिक रक्कम शिल्लक असल्यामुळे त्यांना खर्च देखील तसाच केला. हॅरी ब्रूक () याला खरेदी केल्यानंतर काव्या मारनची रिएक्शन पाहण्यासारखी होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ब्रूकला खरेदी केल्यानंतर काव्या मनापासून खुश झाल्याचे या व्हिडिओत आपण पाहू शकतो.
Only reason for me to watch #iplauction2023 🤌❤️ #KavyaMaran pic.twitter.com/R6Obcw1Tbd
— .ج 🇵🇸 (@Its_Junnu) December 23, 2022
काव्या मारन हिला अनेकदा भारताची ‘नॅशनल क्रश’ असे म्हटले जाते. ती जेव्हा कधी मैदानात किंवा लिलावात उपस्थित राहते, तेव्हा चर्चा होतच असते. यावेळी देखील असेच झाले. हॅरी ब्रूक सध्या त्याच्या सर्वोत्तम फॉरममध्ये आहे आणि याचा फायदा त्याला लिलावात मिळाला. ब्रूकव्यतिरिक्त सनरायझर्सन मयंक अगरवाल याला 8.25 कोटी रुपये खर्च करून ताफ्यात सामील केले. ब्रूकला खरेदी केल्यानंतर काव्याची रिएक्शन सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
https://twitter.com/kaviyamaran_srh/status/1606231287982968833?s=20&t=jwZQ55-YabwtSmZQOcTG1w
हॅरी ब्रूकच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्यांने नुकत्याच पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत तीन शतके केली आहेत. मालिकेतील प्रत्येक सामन्यात ब्रूकच्या बॅटमधून शतक निघाले असून इंग्लंडने ही मालिका 0-3 अशा अंतराने नावावर केला. (Kavya Maran gave a smile while ropping Harry Broolka)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मि. कंसिस्टंट ‘जगदीसन’ केकेआरकडे! इतक्या रकमेत बनला नाईट रायडर
आयपीएल 2023च्या लिलावात मनीष पांडेवर लखनऊने केली पैशांची उधळण, बेस प्राईजपेक्षा दुप्पट रक्कम खिशात