इंडियन प्रीमियर लीग २०२२चा बारावा सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर झालेला हा सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यासाठी हैदराबाद संघाची सह-संघमालक काव्या मारन हिनेही हजेरी लावली होती. या सामन्यादरम्यान असा काही क्षण आला होता, ज्यामुळे काव्या उदास दिसली होती. परंतु पुढे तिच्या चेहऱ्यावरची कळी खुलली.
त्याचे झाले असे की, या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादने (SRH vs LSG) प्रथम गोलंदाजी निवडली होती. परिणामी लखनऊकडून कर्णधार केएल राहुल आणि यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) फलंदाजीसाठी आले होते. परंतु लखनऊ संघाला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. हैदराबादच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासूनच सामना आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न केला आणि लखनऊला १६९ धावांवर रोखले.
या सामन्यातील दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिल्या षटकात फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) लखनऊचा खतरनाक फलंदाज डी कॉकला झेलबाद केले होते. त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर डी कॉक केवळ एका धावेवर केन विलियम्सनच्या हातून झेलबाद झाला होता. याच षटकातील पुढच्याच अर्थात पाचव्या चेंडूवर एविन लुईसही (Evin Lewis) पायचित झाला होता. परंतु पंचांनी त्याला नाबाद दिले होते. यानंतर हैदराबाद संघाने डीआरएससुद्धा घेतला. परंतु लुईस त्यातून बचावला. हे पाहून स्टँड्समध्ये बसलेली काव्या (Kavya Maran) मात्र निराश झाल्याचे दिसली.
Kavya maran 🧡pic.twitter.com/y6VSUY1ZuN
— Taurus (@itz_chillax) April 4, 2022
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1511002727559532547?s=20&t=dryvM4Iy2eALFyCJrohN-A
त्यानंतर भुवनेश्वर कुमारने डावातील तिसरे षटक टाकले. पुढे लगेचच चौथे षटक टाकण्यासाठी सुंदर आला आणि त्याने मागील षटकातील विकेटची कसर या षटकात भरून काढली. त्याने त्याच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर लुईसला एका धावेवर पायचित केले. अशाप्रकारे संघाला पावरप्लेमध्ये २ मोठ्या विकेट्स मिळाल्याचे पाहून निराश झालेल्या काव्याची कळी खुलली. तिच्या या प्रतिक्रिया कॅमेरात कैद झाल्या असून. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
https://twitter.com/Vinayak2130/status/1510987476663672834?s=20&t=VpoFjUW1Y7oDGb17b1f0uw
लखनऊ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघ– केन विलियम्सन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडेन मार्करम, अब्दुल सामद, रोमारियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीच्या सीएसकेची दाणादाण उडवणारा पदार्पणवीर वैभव अरोरा, एकेकाळी क्रिकेटला ठोकणार होता रामराम
कोण आहे जीतेश शर्मा? ज्याने आयपीएल पदार्पणात स्टार क्रिकेटर धोनीला बाद करण्यात दिले योगदान
आयपीएल सोडून थेट ऑस्ट्रेलियात पोहोचला बुमराह! ‘त्या’ गोलंदाजाने सर्वांनाच पाडले बुचकळ्यात