इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने अखेरच्या चेंडूवर जिंकला. यासह चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळवला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला चेन्नईकडून डकवर्थ-लुईस नियमानुसार 5 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. या सामन्यात चेन्नईने दणदणीत विजय मिळवताच संघाचा माजी खेळाडू आणि या हंगामात समालोचन करत असलेला केदार जाधव हा भलताच खुश दिसला. त्याने मराठीतून धोनी आणि सीएसके संघाला शुभेच्छा देत जल्लोष केला. आता त्याचा यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
काय म्हणाला केदार जाधव?
केदार जाधव (Kedar Jadhav) हा आयपीएल 2023 हंगामात मराठीतून समालोचन करत होता. त्याने गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) संघातील अंतिम सामन्यातही जबरदस्त समालोचन करत सर्वांचे लक्ष वेधले. झाले असे की, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने विजयी चौकार मारताच केदार खूपच खुश झाला आणि त्याने जल्लोष करण्यास सुरुवात केली. त्याने यावेळी मराठीतून एमएस धोनी (MS Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचे कौतुक केले.
सध्या सोशल मीडियावर केदार जाधव याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो म्हणताना दिसत आहे की, “महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय, एकच वादा, धोनी दादा. पाचव्यांदा विजेतेपद गुजरातला घरात घुसून हरवलेलं आहे याठिकाणी.”
Kedar Jadhav’s reaction and celebrations in Commentary when CSK won the IPL 2023 Trophy.pic.twitter.com/mEc25jDcZV
— CricketMAN2 (@ImTanujSingh) May 29, 2023
सामन्याचा आढावा
या सामन्यात नाणेफेक जिंकून धोनीने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी गुजरातने साई सुदर्शन याच्या 47 चेंडूत 96 धावांच्या आणि वृद्धिमान साहा याच्या 39 चेंडूत 54 धावांच्या जोरावर 20 षटकात 4 विकेट्स गमावत 214 धावा केल्या होत्या. यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना मथीशा पथिराना याला सर्वाधिक 2 विकेट्स घेण्यात यश आले. मात्र, चेन्नईचा डाव सुरू झाल्यानंतर पावसाने खोडा घातला. त्यामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार सीएसकेला विजयासाठी 15 षटकात 171 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान चेन्नईने अखेरच्या चेंडूवर यशस्वीरीत्या पार केले. यावेळी चेन्नईकडून डेवॉन कॉनवे (Devon Conway) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 25 चेंडूत 47 धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. या खेळीत त्याने 2 षटकार आणि 4 चौकारही मारले. याव्यतिरिक्त शिमव दुबे हादेखील 32 धावांवर नाबाद राहिला. (kedar jadhav happy after csk won 5th time ipl title against gt in ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर धोनीने IPL निवृत्तीवर मौन सोडलेच; 142 कोटी भारतीयांना अपेक्षित होतं, तेच बोलला ‘माही’, लगेच पाहा
IPL ट्रॉफी हुकली, पण पुरस्कार पटकावण्यात टायटन्स आघाडीवर; वाचा कुणी-कुणी कोरलं पुरस्कारांवर नाव