---Advertisement---

टीम इंडियाला नडणाऱ्या दक्षिण आफ्रिकी फलंदाजाला आयसीसीकडून बक्षीस, बनला जानेवारीचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर

On: सोमवार, फेब्रुवारी 14, 2022 10:42 PM
Keegan Petersen and Rassie van der Dussen
---Advertisement---

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात तीन सामन्याची कसोटी मालिका खेळली गेली. दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या कसोटी मालिकेत यजमान आफ्रिका संघाने विजय मिळवला. या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कीगन पीटरसनला (keegan petersen) जानेवारी महिन्यासाठी ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ ( ICC player of the month) म्हणून निवडण्यात आले आहे. महिला गटात इंग्लंडची कर्णधार हिथर नाइट हीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

पीटरसन व्यतिरिक्त १९ वर्षांखालील स्पर्धेतील खेळाडू डेवाल्ड ब्रेव्हिस आणि बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेन यांनाही नामांकन देण्यात आले होते. पण त्या दोघांना मागे टाकत पीटरसनने विजय मिळवला आहे. पीटरसनने भारताविरुद्धच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेसाठी शानदार फलंदाजी केली आणि मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. ही मालिका ०-१ ने पिछाडीवर असताना सुद्धा त्याच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिका संघाने २-१ ने मालिकेत विजय मिळवला. या सामन्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पीटरसनने काही उत्कृष्ट खेळी खेळल्या. पीटरसनने दोन सामन्यांमध्ये ६१ च्या सरासरीने २४४ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. त्या मालिकेत त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले होते. भारताने या दौऱ्यावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली फक्त एक कसोटी सामना जिंकला होता.

महिला क्रिकेटमध्ये इंग्लंडची कर्णधार हिथर नाइट हिला प्लेयर ऑफ द मंथ द मंथ देवून गौरवण्यात आले आहे. ती फलंदाज असून तीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावात शानदार खेळी करत नाबाद १६८ धावा केल्या होत्या. तसेच महिला क्रिकेटरपैकी आत्तापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही कर्णधाराची ही दुसरी सर्वोच्च खेळी होती. या कसोटीत दोन्ही डावात मिळून हिथरने २१६ धावा केल्या आणि तिच्या खेळीमुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला या सामन्यात जोरदार टक्कर दिली. अखेर शेवटची विकेट वाचवून इंग्लंड संघाने सामना अनिर्णित राखला.

महत्त्वाच्या बातम्या-

मेगा ऑक्शननंतर ट्वीटरवर #Boycott_ChennaiSuperkings होतंय ट्रेंड, काय आहे कारण? वाचा सविस्तर

बिग ब्रेकिंग! भारताला तिसरा धक्का, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर टी२० मालिकेतून बाहेर; ‘हे’ आहे कारण

आयपीएल स्पर्धेचे सर्व १४ हंगाम खेळणारे हे ४ शिलेदार, १५ व्या हंगामात राहिले अनसोल्ड; पाहा यादी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---