---Advertisement---

आज भारतीय पाठीराखे कुणाला पाठींबा देणार? इंग्लंड की न्यूझीलंड?

On: बुधवार, जुलै 3, 2019 3:26 PM
---Advertisement---

आज(3 जूलै) 2019 विश्वचषकात 41 वा सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात रिवरसाईड ग्राऊंडवर रंगणार आहे. या सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. तसेच या सामन्यावर इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघांसमोरील उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठीचे समीकरणे अवलंबून आहेत.

या सामन्यात जर न्यूझीलंडने विजय मिळवला तर ते थेट उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करतील. मात्र जर असे झाले तर इंग्लंडला 5 जूलैला पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव व्हावा अशी आशा करावी लागेल. कारण जर या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला तर पाकिस्तान उपांत्य फेरीत जातील आणि इंग्लंडचे आव्हान संपेल.

तसेच पण आज जर इंग्लंडने विजय मिळवला तर इंग्लंड उपांत्य फेरीत प्रवेश करेल. पण त्यामुळे पाकिस्तान समोर उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होईल.

त्याचबरोबर पाकिस्तानला न्यूझीलंडच्या नेटरनरेटला मागे टाकण्यासाठी बांगलादेश विरुद्ध मोठा विजय मिळवावा लागेल. ज्यामुळे ते नेटरनरेटच्या आधारावर न्यूझीलंडला मागे टाकून उपांत्यफेरीत प्रवेश करतील.

या समीकरणांचा विचार करता इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटपटू केविन पीटरसनने ट्विटरवरुन भारतीयांना इंग्लंडला पाठिंबा देण्याबद्दल विचारले आहे.

त्याने ट्विट केले आहे की ‘किती भारतीय आज इंग्लंडला पाठिंबा देणार? आम्हाला 1.2 कोटी भारतीयांचा पाठिंबा मिळेल का? जर हो असेल तर रिट्विट करा.’

https://twitter.com/KP24/status/1146291193757786112

पीटरसनच्या या ट्विटवर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. यातील अनेक प्रतिक्रियांमध्ये चाहत्यांनी न्यूझीलंडला पाठिंबा देणार असल्याचे सुचवले आहे.

https://twitter.com/18prajakta/status/1146295521000284160

https://twitter.com/KashirAli17/status/1146297053598879744

https://twitter.com/Kshitwitt/status/1146292158212845568

https://twitter.com/eshan_b/status/1146291317602959360

https://twitter.com/confess2gaurav/status/1146293919862415360

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ: टीम इंडियाला पाठिंबा देणाऱ्या कोण आहेत या ८७ वर्षीय आजी, जाणून घ्या

मोठी बातमी – अंबाती रायडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

विश्वचषकात रोहित शर्मा-केएल राहुल जोडीने रचला मोठा इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment