मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झालं आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिल्या कसोटी सामन्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंडचा नियमित कर्णधार जो रूट खेळत नसल्याने त्याच्या ऐवजी बेन स्टोक्स हा संघाची धुरा सांभाळत आहे.
बेन स्टोक्सला इंग्लंडचा कर्णधार नेमल्यामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
केविन पीटरसन म्हणाला, “मी जो रुटच्या जागी बेन स्टोक्स याला कर्णधार निवडण्याऐवजी जोस बटलरकडे संघाची धुरा सोपवली असती. स्टोक्स असा खेळाडू आहे, ज्याला प्रेक्षक आवडतात. त्याच्या आजूबाजूला उर्जा भरलेली असताना त्याने कठिण परिस्थितीत स्वत:ला सिद्ध केले आहे. यावेळी कठिण परिस्थिती आहे पण आजूबाजूला उर्जा नाही. त्यामुळे ती उर्जा खेळाडूंना स्वत: तयार करावी लागेल.”
“स्टोक्स संघातला सर्वोकृष्ट खेळाडू आहे. पण सर्वश्रेष्ठ खेळाडू नेहमीच कर्णधार म्हणून सर्वोत्तम पर्याय होऊ शकतो का? माझा याच्यावर विश्वास नाही. मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरुन हे बोलत आहे. जसे तूम्ही कर्णधार बनता तसे तूमच्या जबाबदाऱ्या बदलतात,” असे केविन पीटरसनने सांगितले.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने मागील काही सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी करत संघासाठी एक मॅचविनर खेळाडू म्हणून पुढे येत आहे. 2019 च्या विश्वचषकात आणि ऍशेस मालिकेमध्ये त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याची ही कामगिरी पाहूनच निवड समितीने जो रुटच्या जागी कर्णधार म्हणून बेन स्टोक्सला निवडले आहे. तो इंग्लंडचा ८१ वा कसोटी कर्णधार ठरला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
वाढदिवसादिवशीच धोनीला मिळाली वाईट बातमी; ‘हा’ संघसहकारी झाला…
जो आपल्या बायकोला सांभाळू शकत नाही, तो भारतीय संघाला काय सांभाळणार?
पहिला कसोटी सामना: नाणेफेकीच्या वेळी जेसन होल्डरला आयसीसीच्या नियमांचा विसर, केली ही सर्वात मोठी चूक