भारताविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पराभूत झालेला इंग्लंड संघ बॅकफूटवर गेला आहे. तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने १५ सदस्यीय संघ जाहीर केला, ज्यामधील पहिल्या दोन कसोटीत अपयशी ठरलेल्या काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. तिसऱ्या कसोटीत विजय मिळण्यासाठी अनेक माजी इंग्लिश खेळाडू सल्ले देत असून, यामध्ये आता माजी कर्णधार केविन पीटरसनची भर पडली आहे.
या खेळाडूंना संघात समाविष्ट करावे
इंग्लंडचा माजी कर्णधार व सध्या समालोचक म्हणून काम करत असलेल्या केविन पीटरसनने तिसऱ्या कसोटीसाठी काही नव्या खेळाडूंना संघात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आहे. पीटरसनने आपल्या स्तंभात लिहिले,
‘तिसऱ्या कसोटीसाठी डेव्हिड मलान, लियाम लिव्हींगस्टोन व हॅरी ब्रुक यांना इंग्लंड संघात समाविष्ट केले जावे.”
हे सर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. ब्रुक याने अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण केले नाही. तर, मलान दोन वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच कसोटी संघात सहभागी झाला आहे. लिव्हींगस्टोनला मर्यादित षटकांचा उत्कृष्ट फलंदाज मानले जाते. मात्र, तो सध्या शानदार फॉर्ममध्ये असल्याने त्याचा फायदा इंग्लंड संघाला होऊ शकतो.
तुफानी फटकेबाजी करत आहे लिव्हींगस्टोन
इंग्लंड टी२० संघाचा सलामीवीर फलंदाज लियाम लिव्हींगस्टोनने सध्या सुरु असलेल्या द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धेत तुफान फटकेबाजी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने स्पर्धेत ८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ६०.४० च्या सरासरीने ३०२ धावा करताना ३ अर्धशतके देखील झळकावलीत. त्याच्या नावे १८ चौकार आणि २३ षटकार जमा आहेत. नुकत्याच पाकिस्तान विरुद्ध संपलेल्या टी२० मालिकेतही त्याने इंग्लंडसाठी सर्वात वेगवान शतक ठोकताना ४३ चेंडूत ९ षटकारांसह १०३ धावा काढलेल्या.
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ-
जो रुट (कर्णधार), रॉरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, सॅम करन, डॅन लॉरेन्स, साकीब मेहमूद, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, मार्क वूड.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/rj-malishka-and-some-girls-dance-to-the-song-yaa-to-impress-neeraj-chopra/
https://mahasports.in/tokyo-olympic-maria-silver-madalist-auction-a-madal-for-infant-opration/