नुकतेच जपानच्या टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. भारताने यावर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये एकूण ७ पदके जिंकली. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंण्यासाठी खेळाडू अपार कष्ट करतात. तरीही अनेकांचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. मात्र, पोलॅडच्या एका ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूकने ऑलिम्पिक पदकाचाच लिलाव केला आहे. तिने एका लहान बाळाच्या उपचारासाठी ह्या पदकाचा लिलाव केला आहे. विशेष म्हणजे ज्यांनी हे पदक विकत घेतल्या, त्यांनीही माणूसकीचे दर्शन घडवत तिचे पदक तिला परत केले.
मारिया आंद्रेजिक ही पोलंडची ऑलिम्पिक रौप्य पदक जिंकलेली खेळाडू आहे. तिला काही वर्षांपूर्वी हाडांच्या कर्करोगाने ग्रासले होते. तिने या गंभीर आजाराला तोंड देऊन यावर्षी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले. या २५ वर्षीय खेळाडूने महिलांच्या भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे.
पण, हे पदक तिने एका नवजात बाळाच्या उपचारासाठी मदत करण्याकरीता या ऑलिम्पिक पदकाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. मिलोस्ज मालिस असे या नवजात बाळाचे नाव आहे. या बाळाची अमेरिकेत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या बाळाचे कुटुंब त्याच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे जमा करत होते.
मिलोस्जाचे आई-वडीलांनी मागच्या आठवड्यात समाजमाध्यमांवर मदतीसाठी एक पोस्ट केली होती. बाळाची शस्त्रक्रिया झाली नाही तर त्याच्या जिवाला धोका आहे.
मारिया आंद्रजिकच्या ऑलिम्पिक पदकासाठी पोलंडच्या एका सुपरमार्केट चेन झाबका पोल्स्काने २००,००० जलोटिसची (५१ हजार डाॅलर्स) बोली लावली. विशेष म्हणजे त्यांनीही माणूसकीचे दर्शन घडवत, बोली लावल्यानंतर ते रौप्यपदक मारिया आंद्रजिकला परत केले. त्यांनी म्हटले की “आम्ही या ऑलिम्पिक खेळाडूने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांनी प्रभावित झालो आहोत.”
त्याव्यतिरिक्त तिच्या प्रशंसकांनीही बाळाच्या मदतीसाठी ७६,५०० डाॅलर्सची मदत जमा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषकासाठी संघ निवडताना निवडसमितीला करावी लागणार तारेवरची कसरत, आहेत ‘इतके’ पर्याय