वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने सोमवारी(9 सप्टेंबर) अष्टपैलू क्रिकेटपटू किरॉन पोलार्डकडे वनडे आणि टी20 संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. विशेष म्हणजे पोलार्ड ऑक्टोबर 2016 ला त्याच्या शेवटचा वनडे खेळला आहे.
याआधी वेस्ट इंडीज टी20 संघाच्या कर्णधारपदी कार्लोस ब्रेथवेट होता. तर वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी जेसन होल्डर होता. पण आता वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने पोलार्डला वनडे आणि टी20 चा कर्णधार केले असून होल्डरला कसोटीचा कर्णधार म्हणून कायम केले आहे.
याबद्दल वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिकी स्केरिट म्हणाले ‘होल्डर हा महत्त्वाचा खेळाडू आहे आणि तो कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहणार आहे. होल्डर पोलार्डच्या संघात राहणार आहे आणि पोलार्डच्या नेतृत्वाखाली तो आणखी चांगला क्रिकेटपटू बनण्यासाठी तो या संधीचा उपयोग करेल.’
‘मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळण्यासाठी पोलार्ड योग्य खेळाडू असून त्याला ही जबाबदारी देण्याची योग्य वेळ आहे. मला पोलार्डमध्ये खेळासाठी असलेली उत्सुकता आणि वचनबद्धता प्रभावित करते.’
पोलार्डने आत्तापर्यंत 101 वनडे सामने खेळले असून यात त्याने 2289 धावा आणि 50 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी20 मध्ये त्याने वेस्ट इंडीजकडून 62 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 903 धावा आणि 23 विकेट्स घेतल्या आहेत. पोलार्ड 2012च्या टी20 विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडीज संघाचाही भाग होता.
मात्र 2 महिन्यांपूर्वी इंग्लंडला झालेल्या 2019 च्या वनडे विश्वचषकासाठी पोलार्डला वेस्ट इंडीजच्या संघात संधी मिळाली नव्हती. पण आता त्याला थेट वेस्ट इंडीजचे कर्णधारपद मिळाले आहे.
कर्णधापदाच्या जबाबदारीबद्दल पोलार्ड म्हणाला, ‘कर्णधारपदाची जबाबदारी मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचे आभार मानतो.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–व्हिडिओ: जेव्हा स्टार्कने घेतली विकेट त्याचवेळी पत्नी एलिसानेही मैदानात केला हा कारनामा
–कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत ‘असा’ कारनामा करणारा राशिद खान पहिलाच खेळाडू
–राशिद खानच्या अफगाणिस्तानने बांगलादेशला कसोटीत पराभूत करत रचला इतिहास