इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा रणसंग्राम सुरू असतानाच मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्स आणि वेस्ट इंडिजचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. याची माहिती त्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. पोलार्डच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे.
कायरन पोलार्डने (Kieron Pollard) १० एप्रिल, २००७मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. एक वर्षानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० क्रिकेटमध्येही पदार्पण केले होते.
https://www.instagram.com/p/CclDQtNpcP8/?utm_source=ig_web_copy_link
पोलार्डच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत १२३ वनडे सामने आणि १०१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने वनडेत २६.०२च्या सरासरीने २७०६ धावा कुटल्या आहेत. या धावा करताना त्याने ३ शतके आणि १३ अर्धशतकेही झळकावली आहेत. तसेच, गोलंदाजी करताना ५.७च्या इकॉनॉमी रेटने ५५ विकेट्सही घेतल्यात. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १०१ सामने खेळताना २५.३१च्या सरासरीने १५६९ धावांचा पाऊस पाडलाय. या धावा करताना त्याने ६ अर्धशतकेही झळकावली आहेत. टी२०त गोलंदाजी करताना त्याने ८.३३च्या इकॉनॉमी रेटने ४२ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कायरन पोलार्डने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत फक्त एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळले, त्याने भारताविरुद्ध दोन्ही क्रिकेट प्रकारातील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
पोलार्ड सध्या आयपीएलच्या १५व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसत आहे. त्याच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १८४ सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने २९.३९च्या सरासरीने ३३५० धावा केल्या आहेत. यामध्ये १६ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, गोलंदाजीत त्याने ८.८२च्या इकॉनॉमी रेटने ६६ विकेट्सही घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘रिषभ पंतने फॉर्ममध्ये येणे खूप गरजेचे, नाहीतर…’, भारताच्या माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
आयपीएल २०२२च्या खाणीतून टीम इंडियाला मिळाले ‘हे’ ३ हिरे; आगामी टी-२० विश्वचषकात मिळवू शकतात स्थान