---Advertisement---

KKRvCSK: ‘संघ सहकाऱ्यांचा सामना करण्याची..,’ बाद झाल्यानंतर पायऱ्यांवर बसण्यामागील कारणाचा रसेलने केला खुलासा

On: शनिवार, एप्रिल 24, 2021 3:45 PM
---Advertisement---

कोलकत्ता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात कोलकाताचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने झुंझार खेळी केली. परंतु तो बाद झाल्यानंतर खूप निराश झालेला दिसला. बाद झाल्यानंतर तो ड्रेसिंग रूममध्ये जाण्याऐवजी ड्रेसिंग रूमच्या पायऱ्यांवर बसून सामना पाहू लागला. त्याचा हा निराश झालेला व्हिडीओ सोशल मीडिया खूप व्हायरल झाला होता. आतार त्याने बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये न जाता पायरीवर बसण्याचे कारण सांगितले आहे.

रसेलने सांगितले की, बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जाऊन बाकी खेळाडूंचा सामना करण्याची माझी हिम्मतच होत नव्हती. 221 धावांचा पाठलाग करताना कोलकता संघाने 31 धावांवर 5 गडी गमावले होते. त्यानंतर फलंदाजी करीता आलेल्या दिनेश कार्तिकने आणि आंद्रे रसेलने स्फोटक फलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले. यामध्ये आंद्रे रसेलने 21 चेंडूत अर्धशतक ठोकले. परंतु सामन्यातील 12 षटकांत सॅम करनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.

खरे म्हणजे सॅम करनने रसेलला आपल्या जाळ्यात फसवले होते. रसेलला वाटले सॅम करन क्षेत्ररक्षणानुसार ऑफ साईडला गोलंदाजी करेल. परंतु करनने लेग साईडला गोलंदाजी करत रसेलचा त्रिफळा उडवला. या सामन्यात रसेलने 22 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या.

याबाबत रसेलने KKR.in शी बोलताना म्हटले की, “बाद झाल्यानंतर मी खूप भावुक झालो होतो. त्यामुळे मला ड्रेसिंग रूममध्ये कसे जावे हेच समजत नव्हते. कारण मला संघाला विजय मिळवून द्यायचा होता.”

पुढे बोलताना रसेल म्हणाला की, “जो पर्यंत मी फलंदाजी करत असतो तो पर्यंत संघाच्या जिंकण्याच्या आशा जिवंत असतात. कारण आपणास माहिती आहे की मी फलंदाजी करताना काहीही होऊ शकतं आणि खूप वेळा मी अस केलंसुद्धा आहे. 20 चेंडूत 100 धावा करणे किंवा 20 षटकार ठोकणे सुद्धा मला शक्य आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

‘एक दिवस मीही आयपीएल खेळेल,’ पाकिस्तानी फलंदाजांचे कंबरडे मोडणाऱ्या गोलंदाजाचे आहे मोठे स्वप्न

पंजाबच्या ‘या’ शिलेदाराने बलाढ्य चेन्नईविरुद्ध झळकावले होते शतक, तरीही मिळाली नाही टीम इंडियात जागा

गोलंदाजी करता येईना अन् फलंदाजीही जमेना, अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सवर बनलाय ओझं! 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---