इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेचे १५ वे हंगाम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. हे हंगाम सुरू होण्यापूर्वी आयपीएल २०२२ (ipl 2022) स्पर्धेसाठी खेळाडूंचा मेगा ऑक्शन सोहळा १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोरमध्ये पार पडला. या मेगा ऑक्शनमध्ये अनेक दिग्गज खेळाडू कोट्यवधी झाले. तर काही दिग्गजांना खाली हात परतावे लागले आहे. दरम्यान नितीश राणावर देखील या ऑक्शनमध्ये मोठी बोली लागली आहे. (ipl mega auctions)
गतवर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघाने (kolkata knight riders) आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात नितीश राणाने (nitish rana) देखील मोलाची भूमिका बजावली होती. परंतु आगामी हंगामासाठी त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने रिलीज केले होते.
आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी पार पडलेल्या लिलावात नितीश राणाला पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या संघात स्थान दिले आहे. त्याला आपल्या संघात स्थान देण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत रंगली होती. अखेर कोलकाता नाईट रायडर्स संघाने ८ कोटी खर्च करत त्याला आपल्या संघात स्थान दिले आहे. त्याची मूळ किंमत १ कोटी रुपये इतकी होती.
महत्वाच्या बातम्या :
‘पर्पल पटेल’चा वाढला भाव; ज्या आरसीबीने २० लाखांना घेतले होते विकत, त्यांनीच यंदा मोजले ‘इतके’ कोटी
बिग ब्रेकिंग! आयपीएल लिलावात बोली प्रक्रिया पार पाडणारे ‘ह्युज एडमिड्स’ चालू कार्यक्रमात कोसळले
पडीक्कलवर आरसीबीने बोली लावण्यातही दाखवला नाही रस, अखेर ‘या’ संघाने ७.७५ कोटींसह केले खरेदी