आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्सने चांगली सुरुवात केली आहे. रविवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हंगामातील ३८ वा सामना रंगला आहे. या सामन्यात विजय मिळवून केकेआर त्यांची विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. सध्या केकेआर ९ पैकी ४ सामन्यांमध्ये विजय मिळवून ८ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसऱ्या हंगामाची सुरुवात संघासाठी चांगली झाली असल्यामुळे केकेआरचे खेळाडू आनंदात दिसत आहेत.
केकेआरने सीएसकेविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून खेळाडूंचा स्विमिंग पूलमधील मस्ती करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. चाहत्यांनाही हा व्हिडिओ आवडलेला दिसत आहे.
व्हिडिओत खेळाडू स्विमिंग पूलमध्ये खेळ खेळताना दिसत आहेत. खेळाविषयी सांगायचे झाले तर, एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूला खांद्यावर उचलले आहे आणि त्याचा प्रतिस्पर्धीही त्याच प्रकारे दुसऱ्या एका खेळाडूच्या खांद्यावर बसलेला आहे. दोन्ही खेळाडू एकमेकांना पाण्यात पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. जो खेळाडू पहिल्यांदा त्याच्या विरोधकाला पाण्यात पाडणार तो विजयी ठरणार, असा हा खेळ आहे. केकेआरने पोस्ट केलेल्या व्हिडिओत संघातील जवळपास सर्व खेळाडू या खेळाचा आनंद घेताना दिसत आहेत.
https://twitter.com/KKRiders/status/1441967009726488581?s=20
दरम्यान, सीएसके आणि केकेआर यांच्यात रविवारी दुपारी ३.३० वाजता सामन्याची आहे. या दोन्ही संघांनी आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चांगली सुरुवात केली आहे. दोन्ही संघांनी सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांच्या प्रतिस्पर्धी संघांना हरवले आहे. दोन्ही संघ आजच्या सामन्यात एकमेकांनी पराभूत करून विजयाची हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात असतील.
सीएसकेला यूएईमध्ये खेळवल्या गेलेल्या आयपीएल २०२० हंगामात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. सीएसकेचे या हंगामामध्ये प्लेऑफपर्यंतही पोहचू शकली नव्हती. या हंगामात चेन्नईच्या फलंदाजांनी चक्रवर्तीने खूप हैराण केले होते. तो आजच्या सामन्यात पुन्हा एकदा चेन्नईच्या फलंदाजांसाठी या फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर धोकादायक ठरू शकतो .
महत्वाच्या बातम्या-
एका नो बॉलमुळे ट्रोल झालेल्या झुलनची टीकाकारांना चपराक, ६०० विकेट्स पूर्ण करत रचला ‘इतिहास’