आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू झाला असून लगेच आज शनिवारी ‘डबल हेडर’मध्ये कोलकता आणि हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. तसेच दोन्ही संघांचा हा या सिजनमधील पहिलाच सामना आहे. पण एकीकडे कोलकताचा कर्णधार श्रेयस अय्यर तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख वेगवान गोलंदाज आणि सर्वाधिक रक्कम मिळालेले मिचेल स्टार्क एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी करतात याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. याबरोबरच या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकला असून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा सामना इडन गार्डन्सवर येथे खेळला जात आहे.
याबरोबरच, फिल्प सॉल्ट आणि सुनिल नारायणने केकेआरला दमदार सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र 2 षटकात 23 धावा झाल्या असताना सॉल्ट आणि नारायण यांच्यातील गोंधलामुळे नारायण धावबाद झाला होता. त्यानंतर व्यंकटेश अय्यरला 7 तर श्रेयस अय्यरला शुन्यावर बाद करत केकेआरची अवस्था 3 बाद 32 धावा अशी करत हैदराबादच्या टी नटराजनने केकेआरच्या टॉप ऑर्डरला सुरूंग लावला होता.
दोन्ही संघांची प्लेइंग 11 –
कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेइंग 11-श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेइंग 11- पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.
महत्त्वाच्या बातम्या-
- गुजरातच्या कॅम्पमध्ये आलेली ती महिला कोण? आधी अंगठी घातली अन् केले किस, पाहा व्हिडिओ
- रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्जचा दिल्ली कॅपिटल्सवर 4 विकेट्सने विजय