---Advertisement---

‘..आणि किंग खान स्वतः मैदानावर उतरला’, सामना जरी कोलकाताने जिंकला तरी सर्वांची मने जिंकली ती शाहरूखनेच – पाहा व्हिडिओ

Shah-Rukh-Khan-Video
---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात बुधवारी (दि. 3) झालेल्या सामन्यात धावांचा अक्षरशः पाऊस पडला. अगोदर फलंदाजीस उतरलेल्या कोलकाता संघाने दिल्लीच्या गोलंदाजांची पिसे काढत सर्वांना चोपून काढले. सुनिल नरायणचे वादळ झाल्यानंतर रिंकू सिंग, आंद्रे रसेल यांनीही आपल्या फलंदाजीची चुनूक दाखवली आणि केकेआर संघाने दिल्लीपुढे 272 धावांचे महाकाय आव्हान दिले. त्याचा पाठलाग करताना दिल्लीने हा सामना 106 धावांनी गमावला. एकीकडे कोलकाता संघाने मोठा विजय साकारत सामना जिंकला तर दुसरीकडे केकेआरचा मालक शाहरूख खान याने मोठे मन दाखवत मैदानावर जे केले त्यामुळे सर्वांचीच मने जिंकली.

बुधवारी कोलकाताना हा सामना जिंकला. तो कोलकाताचा यंदाच्या हंगामातील सलग तिसरा विजय होता. केकेआरने विजयाची हॅटट्रीक केली. त्यामुळे संघमालक शाहरूख खान खुप खुश झाला होता. पण दिल्लीच्या फलंदाजांमध्ये रिषभ पंत आणि स्टब्ज यांनी केलेली फलंदाजी देखील सर्वांनी पाहावी अशीच होती. त्यामुळे सामना संपल्यानंतर शाहरूख खान मैदानावर आला आणि त्याने स्वतःच्या संघासोबतच प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंची देखील भेट घेतली. ( KKR V DC Shah Rukh Khan hugs Gautam Gambhir kisses Rishabh Pant Watch Video actor motivated players )

दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्याच शाहरुख खान विशाखापट्टनमच्या मैदानावर उपस्थित होता. शाहरुख खानने आपल्या टीमच्या परफॉर्मन्सला सलाम तर केलाच, पण नंतर केकेआरच्या विजयानंतर शाहरुख स्वतः मैदानावर उतरला. शाहरुखने केकेआरच्या प्रत्येक खेळाडूला मिठी मारली. कॅप्टन श्रेयस अय्यर, मेंटॉर गौतम गंभीर, रिंकू सिंह आणि तुफानी फलंदाजी करणाऱ्या अंगकृष रघुवंशीला त्याने विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पण शाहरुखने फक्त त्याच्या टीमच्या खेळाडूंवर प्रेम व्यक्त केले असे नाहीतर तो दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंना सुद्धा भेटला. रिषभ पंत बरोबर बराचवेळ तो बोलत होता. रिषभने या सामन्यात कमालीची फलंदाजी केली होती, त्यामुळे शाहरुखने रिषभचे तोंडभरून कौतूक केले.

पाहा शाहरूख खान याचा तो व्हिडिओ….

अधिक वाचा –
– सुपर फॉर्ममध्ये असलेल्या CSK संघाला धक्का! प्रमुख गोलंदाज तातडीने मायदेशी परतला, संपूर्ण स्पर्धेला मुकणार? । IPL 2024
– कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? दिल्लीविरुद्ध आयपीएलच्या पहिल्याच डावात ठोकलं तुफानी अर्धशतक 
– कोण आहे ऋषभ पंतची रूमर्ड गर्लफ्रेंड? अनेक वर्षांपासून आहेत दोघं रिलेशनशिपमध्ये

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---